थेट पाइपलाईनचं पाणी पुईखडीत दाखल,कोल्हापूरकरांचा पुढील ५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न मिटला..

Kolhapur

November 12, 2023

कोल्हापूरकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळाव यासाठी मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असताना डिसेंबर २०१३ मध्ये थेट पाइपलाईन योजना आखण्यात आली होती. तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शिफारशीनंतर या योजनेसाठी सुमारे ४८३ कोटीचा निधी मंजूर केला. आणि ऑगस्ट २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली. गेली आठ, नऊ वर्ष या योजनेचे काम सुरू होते. आमदार सतेज पाटील यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी याकडे पाठपुरावा करत कामाला गती आणली. जुलै महिन्यात जॅकवेलचे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने पाणी जॅकवेलमध्ये आले आणि पहिला टप्पा पूर्ण झाला. पाईपलाईनचं पाणी पुईखडी येथे दाखल होताच आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेस नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जलपूजनसाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत हलगी च्या ठेक्यावर आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तर सतेज पाटील यांना पुईखडी येथे अभंगास्नान घालण्यात आले. तर थेट पाईपलाईनचे पाणी घेऊन श्री करवीर निवासिनी अंबाबाईला नेऊन अर्पण करण्यात आले.

Join #TeamSatejPatil

A one step towards the betterment of Kolhapur and Maharashtra.

Come ahead and let's start an interaction.

Legislative Party Leader (Congress), Vidhan Parishad

President, Kolhapur District Congress Committee

Mobile No.

+91-9823012905

Phone

+91-231-2653288 / 89 / 90

Fax

+91-231-2653426

Main Office

2126 E, “Ajinkyatara”, Tarabai Park,

Kolhapur, State- Maharashtra, Country- India

Pincode- 416003

© 2026 Satej Patil. All Rights Reserved.