माझ्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी वेळ काढल्याबद्दल धन्यवाद. माझे जमिनीशी जोडलेले असणे, ही तुम्हाला होणारी माझी पहिली ओळख असली पाहिजे, असे मला वाटते. आपण कुठून आलो आहोत, आपली पाळेमुळे काय आहेत, हे ज्या माणसाला माहीत असते, तो नेहमीच उत्तुंग झेप घेईल; आयुष्यात नेहमीच उत्कर्षाप्रत पोहोचेल. मला घडवण्यामध्ये कोल्हापूरचे प्रचंड योगदान असल्याची जाणीव मला आहे. छत्रपती शाहू महाराज हे माझे सुरुवातीचे आणि सर्वांत अग्रगण्य प्रेरणास्थान राहिले आहेत. ते साजेसे राजे होते आणि खरेखुरे समाजसुधारक होते. त्यांना कोल्हापूर प्रत्येक अंगाने बहरलेले पाहायचे होते. त्यांच्या उद्देशाने मी प्रेरित आहे. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीस, १९९१ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष या नात्याने मी, व्यक्तीला प्रगती करण्यापासून थांबवणाऱ्या मुद्द्यांचा अभ्यास केला होता. हा अभ्यास स्थानिक पातळीवर, कोणतीही संबंधित गोष्ट न वगळता सर्वांगाने करण्यात आला होता. तिथून माझे विश्लेषण मी व्यापक स्तरावर, एकूण समाजावर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांपर्यंत विस्तारत नेले. या दोन्ही स्तरांमधील परस्परसंबंधांमुळे माझा व्यापक दृष्टीकोन तयार होण्यास मदत झाली. तेव्हापासूनच, कोल्हापूरच्या पायाभूत विकासासाठी आणि प्रत्येक कोल्हापूरकराच्या प्रगतीसाठी मी पुढाकार घेत आलो आहे. नोव्हेंबर, २०१० ते जून, २०१४ दरम्यान मला राज्याच्या गृह, ग्रामविकास आणि अन्न व औषध प्रशासन या खात्यांचे राज्यमंत्रीपद भूषवण्याचा सन्मान मिळाला. या कार्यकाळामध्ये मी युवकांच्या गुटकासेवनावर बंदी घातली. त्याचबरोबर, छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेल्या वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यावर मी लक्ष केंद्रित केले. यातूनच मी कोल्हापूरच्या विकासासाठी १,१५० कोटी रुपये मंजूर करून घेण्यासाठी प्रवृत्त झालो. काळम्मावाडी धरणामधून शुद्ध आणि सुरक्षित पेयजल पुरवठा या कोल्हापूरकरांच्या बहुप्रतिक्षित मागणीसाठी त्यांपैकी ४२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
मी हाती घेतलेल्या विकासात्मक प्रकल्पांमुळे आमच्या प्रिय शहराच्या शांततेला बाधा पोहोचणार नाही, याची खातरजमा मी करत आलो आहे. निसर्गाने आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे सौंदर्याने नटलेले शहर भेट दिले असून त्याच्या निसर्गवैशिष्ट्यांचे जतन करणे आणि ती वैशिष्ट्ये आपल्या भविष्यातील पिढ्यांकडे सोपवणे ही आपली जबाबदारी आहे. शांततेवर विपरित परिणाम न होता विकास साधण्याचा हाच दृष्टीकोन तुम्ही सर्वांनी बाळगावा, अशी मी तुम्हाला विनंती करतो.
जानेवारी, २०२० मध्ये, महाराष्ट्र सरकारच्या गृह (शहर), गृहनिर्माण, वाहतूक, माहिती-तंत्रज्ञान, संसदीय कामकाज आणि माजी सैनिककल्याण या खात्यांचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला दिल्याबद्दल मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा ऋणी आहे.
धन्यवाद.
विधान परिषद आमदार, गृह (शहर), गृहनिर्माण, वाहतूक, माहिती-तंत्रज्ञान, संसदीय कामकाज आणि माजी सैनिककल्याण राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन.
मोबाईल क्र.
+91-9823012905
फोन
+91-231-2653288 / 89 / 90
फॅक्स
+91-231-2653426
मुख्य कार्यालय
२१२६ इ, “अजिंक्यतारा”, ताराबाई पार्क,
कोल्हापूर, राज्य- महाराष्ट्र, देश- भारत
पिनकोड- ४१६००३
© 2025 Satej Patil. All Rights Reserved.