Kolhapur
कोल्हापूर- दक्षिण शर्यत शौकिन आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सतेज- ऋतु बैलगाडी शर्यत स्पर्धा नेर्ली येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेला माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्यासोबत उपस्थित राहिलो. हजारो शर्यतप्रेमींच्या उपस्थितीत रंगलेल्या चुरशीच्या शर्यती, उसळलेला जल्लोष आणि स्पर्धेचा थरार यामुळे शर्यतशौकिनांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणे फिटले. लिंगनूरच्या अजिंक्य कोपर्डेकर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांकाचा मान मिळवत ट्रॅक्टर जिंकला. द्वितीय क्रमांकाचे 2 बुलेट मोटरसायकलींचे बक्षीस कोल्हापूरच्या संदीप पाटील यांनी, तर तृतीय क्रमांकाचे 2 होंडा युनिकॉर्न मोटरसायकलींचे बक्षीस कुर्डु गावच्या शिवाजी पाटील यांनी पटकावले. यावेळी गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासो चौगले, अभिजीत तायशेटे जिल्हा परिषद गटनेता एकनाथ पाटील, सदस्य सुदर्शन खोत, संग्राम पाटील, हेमंत पाटील, नारायण गाडगीळ, सागर पाटील, गजानन पाटील, संजय पोवार- वाईकर, बिद्री सहकारी साखर कारखाना संचालक संभाजी पाटील,आर. एस. कांबळे, पं. स. सदस्य संदिप पाटील, गो. शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे यांच्यासह महाराष्ट्र भरातील शर्यत शौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एक पाऊल.
पुढे या आणि संवाद सुरु करूया.
मोबाईल क्र.
+91-9823012905
फोन
+91-231-2653288 / 89 / 90
फॅक्स
+91-231-2653426
मुख्य कार्यालय
२१२६ इ, “अजिंक्यतारा”, ताराबाई पार्क,
कोल्हापूर, राज्य- महाराष्ट्र, देश- भारत
पिनकोड- ४१६००३
© 2026 Satej Patil. All Rights Reserved.