Kolhapur
शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी 12 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांनी इसबावी ते विठ्ठल मंदिर अशी सुबुद्धी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नेते, माजी मंत्री सतेज पाटील, रासपचे नेते महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी दिंडीमध्ये सहभागी झाले होते. इसबावी येथील एका मंगल कार्यालयामध्ये आज सकाळी बाधित शेतकऱ्यांचा मेळावा झाला, त्यानंतर इसबावी ते विठ्ठल मंदिर अशी भरपावसात या नेतेमंडळींच्या उपस्थितीत सुबुद्धी दिंडी काढण्यात आली. सुमारे सहा ते सात किलोमीटर पायी दिंडीमध्ये सुमारे 2000 शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते सहभागी झाले होते.
कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एक पाऊल.
पुढे या आणि संवाद सुरु करूया.
मोबाईल क्र.
+91-9823012905
फोन
+91-231-2653288 / 89 / 90
फॅक्स
+91-231-2653426
मुख्य कार्यालय
२१२६ इ, “अजिंक्यतारा”, ताराबाई पार्क,
कोल्हापूर, राज्य- महाराष्ट्र, देश- भारत
पिनकोड- ४१६००३
© 2026 Satej Patil. All Rights Reserved.