Kolhapur
‘ब्रँड कोल्हापूर कट्टा’ या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेते सचिन खेडेकर यांनी उपस्थिती लावली. आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमात सचिन खेडेकर यांनी आपल्या अभिनय प्रवासातील अनुभव, वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील रंजक किस्से तसेच कोल्हापूरच्या समृद्ध संस्कृतीवर दिलखुलास भाष्य केले. त्यांनी कोल्हापूरच्या आदरातिथ्याचे, खाद्यसंस्कृतीचे आणि कलेला राजाश्रय देणाऱ्या ऐतिहासिक वारशाचे कौतुक केले. तसेच, कोल्हापूर ही कलावंतांची खाण असल्याचे सांगत येथील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमातून कोल्हापूरची सांस्कृतिक ओळख, कलावैभव आणि कलाकारांप्रती असलेला आदर अधोरेखित झाला.
कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी एक पाऊल.
पुढे या आणि संवाद सुरु करूया.
मोबाईल क्र.
+91-9823012905
फोन
+91-231-2653288 / 89 / 90
फॅक्स
+91-231-2653426
मुख्य कार्यालय
२१२६ इ, “अजिंक्यतारा”, ताराबाई पार्क,
कोल्हापूर, राज्य- महाराष्ट्र, देश- भारत
पिनकोड- ४१६००३
© 2026 Satej Patil. All Rights Reserved.