प्रमुख मार्गाच्या विकास कामाचे शुभारंभ

प्रमुख मार्गाच्या विकास कामाचे शुभारंभ

कोल्हापुरातील शिवाजी पूल ते गंगावेश या शहराला जोडणाऱ्या प्रमुख मार्गाच्या विकास कामाचे शुभारंभ माजी नगरसेविका जयश्री चंद्रकांत जाधव वहिनी यांच्या उपस्थितीमध्ये आज करण्यात आले.
या प्रमुख रस्त्याच्या कामासाठी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी निधी मंजूर केला होता मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचे काम प्रलंबित होते.
जास्त वर्दळीचा हा रस्ता असल्याने या रस्त्याच्या कामासाठी माझ्या आमदार फंडातून ५० लाख रुपये तात्काळ मंजूर करून आज रस्त्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे.
तसेच, कोल्हापूर शहरातील महावीर गार्डन आणि हुतात्मा गार्डन या दोन बगीच्यांचे सुशोभीकरण करण्यासह स्मशानभूमीचे विस्तारीकरण करण्याचे काम ही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत.