सतेज कृषी 2018- पत्रकार परिषद

सतेज कृषी 2018- पत्रकार परिषद

येत्या 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत सतेज कृषी 2018 या भव्य कृषी आणि पशु प्रदर्शनाचे आयोजन तपोवन मैदान, येथे करण्यात आले आहे.

शेतीची उत्पादन क्षमता कशी वाढेल तसेच शेतीतील नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचावे या उद्देशाने या सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले आहे.

या प्रदर्शनामध्ये 180 पेक्षा जास्त कृषी कंपन्यांचा सहभाग, तीनशे पेक्षा जास्त पशु पक्षांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनात शेती, दुग्धोत्पादन विषयक तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. विविध शेती अवजारे, बी बियाणे, खते आणि फुलांचे प्रदर्शन आणि विक्री यांचा समावेश असणारे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहे.

चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात प्रयोगशील शेतकरी वर्गाचे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवासह मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळच्या सत्रात पोवाडे यासह विविध मनोरंजनाचे कार्यक्रमही होणार आहेत. विविध नामांकित कंपन्यांच्या स्टॉल्स बरोबर वेगवेगळी ट्रॅक्टर्सही शेतकऱ्यांना पहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनात तीनशेहून अधिक जातीवंत जनावरे असणार असून यामध्ये लाल गांधारी जातीची गाय, देवणी गाय, जर्षि, डॅनिष गायींचा समावेश असणार आहे. 30 ते 35 लिटर दुध देणारी जातीवंत खिलार गाय ही या प्रदर्शनात असणार आहे. वळू, पंढरपुरी म्हैस, रेडे, वनराज, टर्की, खडकनाथ कोंबड्याही पाहायला मिळणार आहेत.

यांच संदर्भात आज तपोवन मैदान येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.