कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण कामांबाबत आढावा

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण कामांबाबत आढावा

कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण कामांबाबत आज प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी, टर्मिनल बिल्डिंग, भूसंपादन, नाईट लँडिंग, कार्गो सेवा, धावपट्टी विस्तारीकरण आदी कामांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी, प्रस्तावित विमानतळ टर्मिनल बिल्डिंगच्या कामाची पाहणी करून सदर काम येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण करण्यासाठी कामगार संख्या वाढविण्याच्या आणि दोन शिफ्ट मध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर-मुंबई या मार्गावरील विमानसेवा सुरु करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असून याबाबत विमान कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच, ही सेवा सकाळच्या सत्रात उपलब्ध करून देण्यावर आमचे विशेष लक्ष आहे. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरु झाल्यानंतर लगेचच कोल्हापूर-शिर्डी विमानसेवा सूर करण्यात येणार आहे. सध्या सुरू असेलल्या कोल्हापूर-अहमदाबाद विमानसेवा नियमित करण्याबाबतच्या सूचना इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांना केल्या. याचसोबत, बेळगाव विमानतळाच्या धर्तीवर कोल्हापूर विमानतळाचे आगमन आणि निर्गमनाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
विमानतळाच्या नाईट लँडिंग प्रक्रियेतील महत्वाचा असलेला पहिला टप्पा पूर्ण झाला असून नुकताच कोल्हापूर विमानतळाला ‘आयएफआर’ परवाना मिळाला आहे. यामुळे, कमी दृश्यमानता असतानाही विमानाचे लँडिंग आणि टेकऑफ करता येणार आहे. त्यामुळे, कमी दृश्यमानतेमुळे ऐनवेळी विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ रद्द करावे लागणार नाहीत. त्यामुळे, लवकरच नाईट लँडिंग सुविधेचे कोल्हापूरकरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
या बैठकीवेळी, विमानतळ संचालक कमल कटारिया, प्रांतधिकारी वैभव नावडकर, संयुक्त संचालक एम प्रशांत वैध्य, सिनिअर मॅनेजर पवन पारधी, शिवाजी साबळे, श्रेयश बाम्हणकर, प्रकाश दुबल, मानसिंग माने, तरून तेज आदिसह एअरपोर्ट ओथॉरिटीचे अधिकारी उपस्थित होते.