कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी (ता. करवीर) येथील महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी (ता. करवीर) येथील महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन

आज कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीवाडी (ता. करवीर) येथील महाराष्ट्रातील पहिल्या डिजिटल जिल्हा परिषद शाळेचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाडजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
९० वर्षांपूर्वी कणेरीवाडी येथे सुरु झालेल्या या शाळेच्या माध्यमातून परिसरामध्ये शिक्षणाची ज्योत पेटविण्यासाठी स्वातंत्रसैनिक तुकाराम रावजी मोरे गुरुजी यांनी अथक प्रयत्न केले होते.
ग्रामस्थांनी ठरवले तर गावाचे रुपडे कसे पालटे याची प्रचिती कणेरीवाडीच्या या शाळेच्या रूपाने आपल्याला येते. घरटी ५०० रु. व अधिक अशी तब्बल १५०० कुटूंबियांनी या शाळेला डिजिटल करणासाठी मदत केली आणि त्याला लोकप्रतिनिधींची सुद्धा उत्तम साथ लाभली.
शाळेची वैशिष्ठये: सर्वात जास्त पटसंख्या ७१३, सर्व २४ खोल्यांमध्ये ई-लर्निंगची सुविधा व साउंड सिस्टिम, डिजिटल बोर्ड, रंगरंगोटी, वारली पेंटिंग्स, बोलक्या भिंती, ऑक्सिजन पार्क, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक लॅब, स्वच्छता गृहे, मैदान, सीसीटीव्ही कॅमेरे आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग सुविधा.
यावेळी, खासदार संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील, आ. जयंत आसगावकर, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जि.प. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, उपाध्यक्ष सतीश पाटील, समाज कल्याण सभापती जि.प. स्वाती सासणे, शिक्षण सभापती प्रवीण यादव, महिला बालकल्याण सभापती सौ. पद्मरानी पाटील, करवीर सभापती सौ. अश्विनी धोत्रे, उपसभापती सुनील पवार, पं.स.सदस्य श्रीमती मंगल पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सरीता शशिकांत खोत, सरपंच श्रीमती शोभा खोत, कुमार मोरे, उपसरपंच अजित मोरे, मोहन कदम, रवींद्र खोत, राहुल ढाकणे, श्रीमती मनीषा महाद्वार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.