कोल्हापुरतील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण

कोल्हापुरतील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरतील राज्योपाध्याय नगर येथील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या सुसज्ज ४८ बेड क्षमतेच्या कोरोना केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
कोरोनाच्या या संकटकाळामध्ये शिवजयंती उत्सवासाठी होणारा खर्च टाळून संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती लोकसहभागातून कोरोना सेंटरची उभारणी केली आहे. सामाजिक बांधिलकीतून समितीने घेतलेला हा निर्णय आदर्शवत व कौतुकास्पद आहे.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील महापालिका आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे वसंतराव देशमुख माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे उपाध्यक्ष सचिन चौगुले, आनंदा पाटणकर शांकी मगदूम आदी उपस्थित होते.