कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कोरोना सद्यपरिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबतआढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कोरोना सद्यपरिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबतआढावा बैठक

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कोरोना सद्यपरिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना करण्यात आली आहे.
राधानगरी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अकराशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत यामधील ८६३ रुग्ण बरे झाले असून २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आगामी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राधानगरी येथे लहान मुलांसाठी ५० बेडचे नवीन कोविड सेंटर सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून राधानगरीसाठी दोन व्हेंटिलेटरवर बेड, एक रुग्णवाहिका आणि एक शववाहिका देण्यात येणार आहेत.
तिसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर तालुक्यातील कोमॉर्बीड मुलांचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करून दक्ष राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून बालरुग्ण विभाग, बालरूग्ण कक्ष स्थापन करणे, बालरोग तज्ञ उपलब्ध करण्यासाठी जाहिरात काढून ताबडतोब पद भरती करण्याच्या सूचनाही यावेळी आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, गोकुळ संचालक अरुणकुमार डोंगळे, गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, किसन चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे, अरुण जाधव, राधानगरी पंचायत समिती सभापती वंदना हाळदे उपसभापती मोहन पाटील, आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे ,वैद्यकीय अधीक्षक गणपती गवळी, हिंदुराव चौगले, सदाशिवराव चरापले, आर के मोरे, राधानगरी तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारी,कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, उपकार्यकारी अभियंता सागर डोंगरे, अमित पाटील, डॉ.पद्मावती भोकरे, कार्यकारी अभियंता अनिल पाटील ,अशोक माने, पोलीस उपनिरीक्षक उदय डुबल, जे.के. पाटील, सुरेश खैरे, शैलेश मोरस्कर, सुधीर जाधव,शहाजी ढेरे, सुशील पाटील, सचिन घोरपडे, बाळासाहेब गुरव आदी उपस्थित होते.