काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामांबाबत आढावा बैठक

काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामांबाबत आढावा बैठक

आज सकाळी 8 वा. काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामाची पाहणी करुन उर्वरीत कामांबाबत आढावा बैठक घेतली.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या एकूण कामांपैकी साधारण ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. जॅकवेलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जॅकवेलसह उर्वरित अन्य सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सोबतच, योजनेच्या हेडवर्क्सच्या कामाची पाहणी करुन सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेतला. ही योजना मार्गत्वास नेताना येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निराकरण करुन योजना मार्गी लावा, अशा सूचना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना केल्या. हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना यावेळी केल्या.
जॅकवेलचे काम मे अखेर पूर्ण होण्यासाठी नियोजन करण्यात आले असून योजनेच्या आवश्यक त्या सर्व चाचण्या घेण्यासाठी सुद्धा सूक्ष्म नियोजन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
यावेळी महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, प्रकल्प अधिकारी राजेंद्र माळी, पाटबंधारे विभागाच्या उपअभियंता भाग्यश्री पाटील, प्रकल्प सल्लागार विजय मोहिते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.