ओला इलेक्ट्रिक’च्या टेस्ट राइड शिबिराचे उदघाटन

ओला इलेक्ट्रिक’च्या टेस्ट राइड शिबिराचे उदघाटन

ओला इलेक्ट्रिक’च्या वतीने त्यांच्या विद्युत वाहनांच्या कोल्हापुरातील टेस्ट राइड शिबिराचे उदघाटन कंपनीचे उपाध्यक्ष श्री बी.सी.दत्तजी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. ओला दुचाकी गाडी ऑनलाईन बुक केलेल्या कोल्हापूरकरांना याचा लाभ घेता येईल.
कोल्हापूरमध्ये ओला’चे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. विद्युत वाहने हि वाहतुकीचे भविष्य आहे आणि आपली शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात या वाहनांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. वाहतूक क्षेत्रातून कार्बनचे उच्चाटन करण्यास, तसेच राज्याला ईव्ही हबमध्ये रूपांतरित करण्यास महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे.
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नुकतेच गृहनिर्माण संस्था आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या व्यक्तींना मालमत्ता करात सवलत देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. ‘ओला’सारख्या कंपन्या किफायतशीर, सुलभ अशी विद्युत वाहने विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्णतेचा उपयोग करीत आहेत, यातून कोल्हापूर आणि महाराष्ट्राचा शाश्वत विकास होण्यास नक्की मदत होणार आहे.
कोल्हापुरला फाउंड्री आणि वाहन उत्पादन क्षेत्रातील उद्योगांचा मोठा वारसा आहे. फक्त भारतातच नव्हे तर जवळपास जगातील प्रत्येक वाहनातील किमान एक पार्ट हा कोल्हापुरातील उद्योगांमध्ये तयार झालेला असतो. वाहन उद्योग क्षेत्रातील कोल्हापुरातील ही कुशलता, मनुष्यबळ आणि ओला कंपनीचे नाविन्यपूर्णता याची सांगड घालून कोल्हापूरमध्ये ओला कंपनीने त्यांचा उत्पादन आणि असेंब्ली प्लांट उभारण्यासाठी यावेळी कंपनीला आमंत्रण केले.