Satej D Patil

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि डी.वाय.पाटील ट्रस्टच्यावतीने जागतिक महिला दिन “Walk For Progress” या महिला रॅलीच्या माध्यमातून अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.

महिला दिनानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. रंगबेरंगी पोशाख, दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे जथे, विविध विषयावर साकारण्यात आलेले देखावे तसच भव्य चित्ररथ अशा अभूतपूर्व उत्साहात ही रॅली पार पडली.

गांधीमैदान येथून रॅलीला सुरवात होणार असल्याने सकाळी सात वाजल्यापासून महिला, महाविद्यालयीन तरुणी, शालेय विद्यार्थिनी आणि एनजिओ तसच महिलांचे ग्रुप, खेळाडू या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होत होते. सुमारे ३७ महिलांच्या ग्रुपनी विविध विषयावर प्रबोधनपर देखावे याठिकाणी सादर केले.

फिनिक्स स्पोर्ट्स च्या मुलींनी चित्तथरारक रोप मलखांब, छत्रपती राजाराम हायस्कूलच्या विद्यार्थिनीनी मर्दानी खेळ, झांजपथक आणि लेझिम खेळाचं उत्कृष्ठ सादरीकरण केल. तसच गोपाळ कृष्ण गोखलेच्या विद्यार्थिनीनी पाणी वाचवा या विषयावर प्रबोधन पर देखावा सादर केला. तर गार्डन क्लबचा महिला, लिंग समानता हा विषय घेवून या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. तर जैन युवती मंडळ आणि मौनी विद्यापीठ गारगोटीच्या तरुणींनी उत्कृष्ठ लेझीम खेळाचे सादरीकरन करीत उपस्थितांचे लक्ष वेधल. रॅलीमध्ये सहभागी महिलांना प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअरच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. गांधी मैदान येथून सकाळी १० वाजता रॅलीला सुरवात झाली, यामध्ये महिला, महाविद्यालयीन तरुणी, शालेय विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होत्या. शिवाजी महाराज तसच शाहू महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत अनेक महिला आणि तरुणी या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. महिलांनी डोक्यावर भगवे फेटे परिधान केले होते. दुचाकी, आणि जय भवानी…. जय शिवाजीच्या घोषात रॅली सकाळी १० वाजता गांधी मैदान येथून मार्गस्थ झाली. बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी अशा प्रमुख मार्गावरून निघालेल्या या रॅलीचा समारोप बिंदू चौक येथे करण्यात आला.

या रॅलीमध्ये प्रतिमा सतेज पाटील, संयोगिताराजे छत्रपती, माजी खासदार निवेदिता माने, महापौर स्वाती यवलुजे, रोहिणी सुभेदार, अनुश्री चौधरी, रुपाली नांगरे-पाटील, प्रकृती निगम-खेमणार,स्मितादेवी जाधव, राजश्री काकडे, राजलक्ष्मी नरके, शिल्पा नरके, समरीन मुश्रीफ, नबीरा मुश्रीफ, माजी महापौर सई खराडे, हसिना फरास, अश्विनी रामाणे, वंदना बुचडे, वैशाली डकरे, सरलताई पाटील, संध्या घोटणे, वनिता देठे, सुरेखा शहायांच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेविका या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होत्या.

या रॅलीत हजारांच्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व भगिनींचे मनःपूर्वक आभार!   

March 8, 2018

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि डी.वाय.पाटील ट्रस्टच्यावतीने जागतिक महिला दिनी “Walk For Progress” या महिला रॅलीच्या माध्यमातून अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्फेअर आणि डी.वाय.पाटील ट्रस्टच्यावतीने जागतिक महिला दिन “Walk For Progress” या महिला रॅलीच्या माध्यमातून अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त काढण्यात…
February 23, 2018

राज्य शासन आणि महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे कोल्हापूरवर महावितरण कार्यलयावर धडक मोर्चा!

राज्य शासन आणि महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो प्रामाणिक शेतकऱ्यांवर आणि सर्व सामन्य नागरिकांवर चुकीचे भारनियमन, वाढीव वीज बील, प्रलंबित विज कनेक्शन, दुप्पट-तिप्पट वीज दरवाढ…
December 2, 2017

मा. खासदार श्री. राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!

मा. खासदार श्री. राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट प्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. खासदार श्री. अशोकराव चव्हाण, मा. आमदार श्री. सतेज पाटील, मा. प्रकाश आवाडे, आदी…
December 17, 2017

स्थानिक आमदार विकास कार्यक्रम २०१६- १७ मधुन कसबा बावडा येथील पॅव्हेलियन हॉल बॅडमिंटन वुडन कोर्ट मंजूर…

स्थानिक आमदार विकास कार्यक्रम २०१६- १७ मधुन कसबा बावडा येथील पॅव्हेलियन हॉल बॅडमिंटन वुडन कोर्ट मंजूर करण्यात आला होता. आज या कोर्ट चे उद्घाटन कोमनपा आयुक्त…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email