वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट, पुणे या संस्थेचा राज्यस्तरीय “कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील – सर्वोत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार”, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री, मा. खा. श्री शरद पवार साहेब, माजी उपमुख्यमंत्री मा. आ. श्री अजितदादा पवार, मा. खा. विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री मा. दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री मा. हर्षवर्धन पाटील, आणि आदी मान्यवरांच्या उपस्थितीत, गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला आहे.
डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यास हा सन्मान मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असणाऱ्या कारखान्याचे सर्व सभासद शेतकरी, संचालक, कर्मचारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार!