भारताची राज्यघटना आणि संविधान बचाव मोर्चा?
भारतात आ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्षे ११ म हिने १७ दिवस सतत सखोल अभ्यास करून भारतीय संविधान लिहले. जगातील सर्व प्रगत राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची राज्यघटना आ. डॉ. बाबासाहेबांनी बनविली आणि २६ जानेवारी १९५० ला भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रयींवर आधारलेल्या राज्यघटनेच्या बळावर लोकशाही राष्ट्र म्हणून भारत हा जगाच्या पाठीवर सर्वात मोठा आणि विविधता असलेला देश म्हणून उभारीस आला.
देशातील विविध स्थरातील लोकांना समान दर्जा मिळावा आणि स्वतः ची सर्वांगीण प्रगती घडवून आणण्यासाठी त्यांना समान संधी मिळावी, यासाठी बाबासाहेबांनी कलमे तयार केली. मागासलेल्या वर्गांना, विशेषतः अस्पृश्य व आदिवासी जाती जमातींना व स्रियांना घटनात्मक हक्क मिळावेत यासाठी देखील कलमे त्यांनी लिहून काढली.
भारताची राज्यघटना २ वर्षे ११ महिने १७ दिवसात लिहिल्या गेली. तिच्यामध्ये ३९५ कलमे ,७ परिशिष्टे आहेत त्याचप्रमाणे घटनेच्या कामकाजासाठी ११ सत्रे झाली. १४१ बैठका झाल्या. ७६३५ दुरुस्त्या सुचविल्या गेल्या, त्यापैकी २४७६ मंजूर केल्या गेल्या. ११४ दिवस घटनेवर चर्चा चालली. १६५ दिवस कामकाज चालले. त्यासाठी ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये इतका खर्च झाला. घटनेचे प्रथम प्रकाशन १९५२ साली झाले. तिच्या १००० प्रती छापण्यात आल्या होत्या. मुळ प्रती इंग्रजीत आहेत इतर १४ भाषेत त्यांचे भाषांतर केले आहे .त्यावर ४४२ सदस्यांच्या सह्या असून ३१ व्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भीमराव आंबेडकर अशी मराठी सही आहे.
२६ जानेवारी १९५० पासून भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिला. आणि मतांच्या आधारेच “प्रजेची सत्ता” निर्माण केली.
एवढे मोठे परिवर्तन भारतरत्न, विश्वविभूषण, भारतीय संविधानाचे शिल्पकार, समस्त भारताचे उद्धारक थोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणले.
मात्र आज या संविधानात सुधारांसाठी मोकळीक असतांना देखील हे संविधानाच बदलून टाकण्याचे भाष्य व कृती सत्ताधारी करत आहेत. संविधानाच्या बचावासाठी आणि देशाच्या रक्षणासाठी आज पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्षाला यल्गार पुकारण्याची वेळ आली आहे.