महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात सतेज (बंटी) डी. पाटील हे एक प्रख्यात आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. प्रेमार्दता, करुणा, शौर्य आणि विजय यांनी ओतप्रोत भरलेली कोल्हापूरची संस्कृती त्यांनी आपल्या आचरणामध्ये रुजवली आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या आशिर्वादाने आणि डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासारख्या थोर नेत्यांच्या कौशल्यपूर्ण मार्गदर्शनाखाली करवीरच्या या चैत्यन्यपूर्ण आणि सक्षम नेतृत्वाची भरभराट होत आहे. लोकशाही ही विविधतेत सामावलेली आहे, अशी धारणा असणाऱ्या भारतातील मोजक्या युवा नेत्यांपैकी ते एक आहेत. विविधता ही भारताच्या उत्कर्षाचा पाया आहे, भाषा आणि संस्कृतींमधील वैविध्य हे भारताला एकत्र बांधून ठेवते. तळागाळातील वंचितांच्या कठीण परिस्थितीची त्यांना जाण आहे आणि त्याभोवती असणाऱ्या सामाजिक मुद्द्यांचीही त्यांना समज आहे. या मुद्द्यासंबंधी क्रियाशील दृष्टीकोन बाळगणारे ते एक दमदार आणि कार्यक्षम राजकारणी आहेत.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील महान व्यक्तिमत्त्व पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र असणाऱ्या सतेज यांचा जन्म १२ एप्रिल, १९७२ रोजी झाला. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकांमध्ये सहभागी होऊन त्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात केली. हा विद्यार्थी एक दखलपात्र ताकद म्हणून उदयास आल्याचे कोल्हापुरातील प्रस्थापित नेत्यांना त्याचवेळी उमगले होते. असंघटित आणि विखुरलेल्या विद्यार्थी उर्जेला सतेज यांनी सामाजिकदृष्ट्या उपयुक्त संघटनेंतर्गत एकत्र आणले आणि पुढे हीच उर्जा समाजकल्याणामध्ये प्रसारित केली. शिवाजी विद्यापीठामध्ये शिकत असताना, सतेज हे १९९२-९३ साली प्रौढ शिक्षण सल्लागार समितीमध्ये होते, तसेच १९९५-९९ दरम्यान ते शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्यही होते.
सतेज डी. पाटील हे नेहमीच महत्त्वाकांक्षी राहिले आहेत; तथापि, गरिबातील गरीब माणसाला प्रतिष्ठापूर्वक आयुष्य जगताना पाहणे, ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. ऑगस्ट, २००० मध्ये त्यांनी पद्मश्री डॉ. डी. वाय पाटील सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. सामाजिक परिवर्तनाप्रतीच्या त्यांच्या कटिबद्धतेची हाक म्हणून त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. २००१ मध्ये कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकांमधील विजय हा त्यांचा पहिला मोठा विजय होता. त्या वेळी, ते गगनबावडा तालुक्यातून बँकेचे संचालक म्हणून विजयी ठरले होते. उत्तुंग यशावर स्वार होतानाही, यश हे अंतिम साध्य नाही, तर केवळ प्रवासातील टप्पा आहे, याचे भान बाळगण्याइतके ते नम्र राहिले. लागलीच त्यांनी आपल्या सामाजिक कार्यक्रमांचा विस्तार करण्यास सुरुवात केली. २००६ साली ते केडीसीसी बँकेचे संचालक म्हणून पुन्हा निवडून आले.
सतेज डी. पाटील हे वारशाचे मोल जाणतात. वारसा जतन करण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे पिता हे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील प्रख्यात व्यक्ती आहेत. सतेज यांनाही शिक्षण क्षेत्रासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. २३ मे, २००३ रोजी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये गणल्या जाणाऱ्या गारगोटी येथील श्री मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, तेव्हा त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. ही खूप मोठी कामगिरी होती, युवा सतेज यांच्या पाठीवरील कौतुकाची आणखी एक थाप होती, मात्र त्यांनी अल्पसंतुष्टतेची भावना स्वतःमध्ये येऊ दिली नाही आणि पुढच्या महत्त्वाकांक्षेकडे, म्हणजेच कोल्हापूरच्या डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टकडे झेप घेतली. कला आणि क्रीडा यांच्या प्रसारासाठी त्यांनी प्रचंड योगदान दिले असून विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, तसेच या ट्रस्टच्या समाजशास्त्रकेंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसाही पुनर्स्थापित केला आहे.
जनतेला सतेज यांच्याबद्दल असणाऱ्या प्रेम आणि आपुलकीमुळे त्यांना कोल्हापूरच्या नागरिकांशी संबंधित मुद्दे उचलून धरण्यासाठी आणि ते राज्य सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी चालना मिळाली. २००४ सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये ते करवीर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार होते. त्या निवडणुकीत त्यांनी सर्व अडथळ्यांवर मात करत या मतदारसंघातून ४२,००० च्या मताधिक्याने विजय मिळवला होता.
युवावर्गाच्या आजुबाजूला एकाचवेळी इतक्या साऱ्या गोष्टी घडत असल्याने, लक्ष विचलित होणे, मार्गभ्रष्ट होणे आणि प्रवाहपतित होणे या तीन गोष्टींपासून युवावर्गाने सावध राहिले पाहिजे. तथापि, सतेज हे कधीही आपल्या उद्दिष्टापासून ढळले नाहीत, त्यांनी नेहमीच उदात्त हेतूवर, विशाल चित्र पाहण्यावर लक्ष केंद्रित केले. विनम्रता, साधेपणा आणि कृतीकेंद्रित दृष्टीकोन या गुणांमार्फत ते कोल्हापूरच्या युवावर्गाला प्रेरित करत आले आहेत. यश हे सतेज यांच्या समाजकार्याच्या विस्तारासाठी उत्तेजक म्हणून काम करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
राजकीय व सामाजिक नेत्यांच्या जन्मदिनी किंवा अन्य विशेष औचित्यप्रसंगी त्यांना पुष्पगुच्छ व शाल देण्याची रूढ प्रथा आहे. परंतु बऱ्याच लोकांना, विशेषतः ग्रामीण भागांतील युवकांना महागड्या पुष्पगुच्छांवर खर्च करणे परवडू शकत नाही आणि त्याचवेळी त्यांना स्वतःला वह्या आणि अन्य शैक्षणिक साहित्याच्या वाढत्या किमतींनाही तोंड द्यावे लागते. त्याचबरोबर, फुलांचा कचरा साचल्याने होणारे जलप्रदुषण हासुद्धा तितकाच निकडीचा मुद्दा आहे. तीन वर्षांपूर्वी – सतेज यांनी सर्वांत अनोख्या पद्धतीने आपला जन्मदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला पुष्पगुच्छांऐवजी वह्या भेट द्याव्यात, अशी विनंती त्यांनी सर्वांना केली. जन्मदिन साजरा करण्याची ही असामान्य पद्धत क्रांतिकारी ठरली, कारण त्यातून ११ लाखांहून अधिक वह्या जमा झाल्या आणि २ लाख ६६ हजार गरजू विद्यार्थ्यांना त्या वह्यांचे वाटप करण्यात आले. बरेच राजकीय नेते आता आपल्या जन्मदिनाचा आनंदोत्सव कोणत्यातरी सामाजिक ध्येयाशी जोडण्याच्या सतेज यांच्या उदाहरणाचे अनुकरण करत आहेत.
सतेज हे ५ नोव्हेंबर, १९९५ रोजी प्रतिमा पाटील यांच्याशी विवाहबद्ध झाले. प्रतिमा या श्री. विजयकुमार गोविंदराव पाटील यांच्या कन्या आहेत. सतेज व प्रतिमा यांना तेजस व देवश्री अशी दोन अपत्ये आहेत.
आपल्या समाजामध्ये महिलांना देण्यात येणाऱ्या दुय्यम स्थानाची सतेज यांना जाणीव आहे. महिलांना त्यांच्या औद्योगिक व व्यापारविषयक कौशल्यांचे संवर्धन व प्रदर्शन करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सतेज यांनी प्रतिमा यांच्यासह गृहिणी महोत्सव या नावाने वार्षिक उपक्रम सुरू केला आहे. मागील सात वर्षांमध्ये, या उपक्रमाद्वारे, ५,००० हून अधिक स्वयंसहायता गटांना आणि २५,००० हून अधिक महिलांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे.
परिपूर्ण ज्ञान, तीक्ष्ण स्मरणशक्ती, समाजातील दुर्बल घटकांविषयी अनुकंपा, चिकाटी आणि लवचिकता हे सतेज डी. पाटील यांना अन्य राजकारण्यांपासून वेगळे बनवणारे काही गुण आहेत. ते आधुनिकता स्वीकारतात, परंतु त्याचबरोबर भारतात उपलब्ध असणाऱ्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबाबतही ठाम राहतात. त्यामुळेच, कोल्हापूरला तीर्थक्षेत्र आणि आयटी हब यांचा संगम असणारे शहर बनवण्यासाठी ते परिश्रमपूर्वक काम करत आहेत.
सतेज डी. पाटील हे भविष्यवेधी नेते असून आपला भविष्यवेध वास्तवात उतरवण्यासाठीची श्रद्धा आणि कृतिशील दृष्टीकोन त्यांच्याजवळ आहे.
मोबाईल क्र.
+91-9823012905
फोन
+91-231-2653288 / 89 / 90
फॅक्स
+91-231-2653426
मुख्य कार्यालय
२१२६ इ, “अजिंक्यतारा”, ताराबाई पार्क,
कोल्हापूर, राज्य- महाराष्ट्र, देश- भारत
पिनकोड- ४१६००३
© 2025 Satej Patil. All Rights Reserved.