“Digital Guardian Workshop”

“Digital Guardian Workshop”

सतेज पाटील फौंऊडेशन, अहान फौंऊडेशन मुंबई, मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “Digital Guardian Workshop” या उपक्रमाची आज मोठ्या दिमाखात सुरवात झाली.

गृहराज्यमंत्री असताना मला सगळ्यात जास्त सतावणारा प्रश्न म्हणजे हा मुलां-मुलींचे ऑनलाईन धोक्यापासून संरक्षण. मंत्री म्हणून काम करत असताना बऱ्याच वेळा अश्या नाजूक परिस्थितीशी दोन हात करावे लागले होते, आणि आज ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अश्या बऱ्याच गोष्टी कानावर पडत असतात.

गेल्या काही दिवसाआधी मी ह्या उपक्रमाबद्दल ट्विटर वर वाचले आणि लगेच मनाशी निर्धार केला की ह्या सारख्या उपक्रमाची सुरवात ही कोल्हापूरातूनच झाली पाहिजे.

आज खऱ्या अर्थाने आपल्या मुलांच्या भविष्यात येणाऱ्या या संभावित धोक्यांशी तोंड देण्यासाठी #Responsible_Kolhapurkar (जबाबदार_कोल्हापूरकर) या मोहिमेची आज सुरवात करण्यात आली. ह्या उपक्रमामधून आपण जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनपर्यंत डिजिटलच्या ह्या युगामध्ये उद्भवणाऱ्या ह्या धोक्यांपासून आपले तसेच आपल्या पाल्यांचे संरक्षण कसे करावे ह्याचे प्रशिक्षण पुरवण्यात येणार आहे.

रोजच्या १.५ जीबी डेटाने गेल्या ३ वर्षात आपले जग पूर्ण बदलले आहे. या १.५ जीबी च्या स्फोटामुळे लोकांना काय करू आणि काय नको असे झाले आहे. इंटरनेट ही अलिबाबाची गुहा आहे, पण ती नक्की कशी उघडायची हे माहीत असायला हवे. अन्यथा फक्त गोंधळ उडेल , आता तसेच झाले आहे.

शिक्षक हा समाजाचा कणा आहे, आजकाल १० व्या वर्षीच मुलं ऑनलाईन येतात. अशावेळी त्यांना Influence करणारा घटक म्हणजे शिक्षक. जर शिक्षकाने त्याला योग्य दिशा दिली, तर या Digital Revolution चा त्याला फायदा घेता येईल, नाहीतर त्याचे नुकसान होईल. पुढची पिढी घडणे किंवा बिघडवणे हे शिक्षक ठरवतात अस म्हणतात. त्यासाठी आता डिजिटल सांगणारे शिक्षक हवेत.

लोकप्रतिनिधी म्ह्णून माझी ही जबाबदारी आहे की एकुणच समाजात Digital Revolution घडत असताना त्यासाठीं समाजमन घडवणे, नुसते डिजिटल मीडिया किती भारी किंवा किती वाईट असे म्ह्णून उपयोग नाही ,तर हा बदल आता आपल्या घरी पोहोचला आहे आणि त्याला आता face करायचे आहे हे expect करुन आपल्याला स्वतः ला तयार होऊन इतरांना guide करावे लागेल.

तुम्ही समाज घडवत म्हणून तुम्ही knowledgeable झालात की सगळ्यांचा फायदा होतील. आज इथे १०० लोक आहेत पण त्यातून कमीत कमी १०,००० लोकांचं आयुष्य डिजिटली सोपं होईल याची मला खात्री आहे.

सेन्सॉरशिप किंवा बंदी हा उपाय नाही, आजकालची पिढी एवढी स्मार्ट आहे की त्यांना बंदी घातली तरी त्यासाठीची पळवाट हि लगेच तयार असते आणि उगाच बंदी घातली तर curiosityअजून वाढते. म्हणून बंदीचा फायदा होत नाही. त्यामुळे, मुलांना responsibly वापर करायला शिकवणे हाच पर्याय. त्यातूनच #Responsible_Netism ही concept सध्या वाढत आहे.

ह्या सगळ्यातला दुसरा महत्वाचा घटक म्हणजे ‘पालक’ ह्या सगळ्यांमध्ये पालक म्हणून हि आपली खूप मोठी जबाबदारी आहे. ह्याच सगळ्या घटकांना Digital Guardian म्ह्णून सुद्धा काम पाहणे गरजेचे आहे. आजचा कार्यक्रम हा असा “#Responsible_Kolhapurkar” घडवण्यासाठी आहे.

यावेळी, दत्ता पाटील, भरत रसाळे, सुरेश संकपाळ, अहान फौंऊडेशनच्या अध्यक्षा सोनाली पाटणकर, वैशाली भागवत, संतोष शिंदे, उन्मेष जोशी, डॉ.जे के पवार, जयंत आसगांवकर, बाबा पाटील तसेच जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email