Uncategorized

आज जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्यातील खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी क्रीडा विभागामार्फत ‘मिशन कोल्हापूर गोल्ड’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे
कोल्हापूर जिल्ह्याला क्रीडा क्षेत्राची उल्लेखनीय परंपरा लाभली आहे. जिल्ह्यातील अनेक नामवंत खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याचा ठसा राज्य, राष्ट्र आणि जागतिक पातळीवर उमटविला आहे.
‘मिशन कोल्हापूर गोल्ड’ अंतर्गत खेळाडूंसाठी गोल्ड, सिल्व्हर आणि ब्रॉण्झ या तीन गटात सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. या गटा व्यतिरिक्त विशेष कौशल्य असणाऱ्या खेळाडूंसाठी मदत व सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करु पाहणाऱ्या जिल्ह्यातील खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक सुविधा देण्याबरोरच फिजिओथेरेपीस्ट, स्पोर्ट्स सायकॉलॉजी, आहरतज्ज्ञ, फिटनेस ट्रेनर, सोनाबाथ सिस्टीम, प्रयोगशाळेमधील विविध तपासण्या, विमा याचा लाभ दिला जाणार आहे.
क्रीडा क्षेत्रात जिल्ह्याचा लौकिक वाढविण्यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शेंडा पार्क येथे जिल्हा क्रीडा संकुल उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेचा प्रस्ताव क्रीडा विभागाने तातडीने पाठवावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
याठिकाणी अद्ययावत क्रीडा संकुल उभारताना पार्किंग, मुलां-मुलींसाठी वसतीगृहे, बहुउद्देशीय हॉल प्रत्येक खेळासाठी स्वतंत्र हॉल अशा सुविधा, जिल्हा क्रीडा संकुल आवारात दिव्यांग खेळाडूंसाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले.
महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभागामधील क्रीडांगणासाठी राखीव जागा उपलब्ध आहेत. या जागेवर विविध खेळांची क्रीडांगणे, इमारती विकसित करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यास सांगितले असून यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत नाविण्यपूर्ण योजनेतून किंवा क्रीडा विभागाच्या सुविधा निर्मिर्तीच्या योजनांतून निधी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले जाणार आहे.
शहरातील खेळाडूंसाठी या ठिकाणी सुविधा निर्माण झाल्यास कोल्हापूर शहराचा स्पोर्ट्स हब म्हणून नावलौकिक होईल. महापालिकेने आयसोलेशन हॉस्पिटल येथे जागा उपलब्ध करुन दिल्यास येथे इनडोअर स्टेडियम बांधण्याचा मानस आहे. महापालिकेने जागा व इनडोअर स्टेडियम उभारणीचा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन झाल्यास जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रास विकास होण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या नवीन खेळाडूंसाठी प्रेरणा मिळेल. यासाठी क्रीडा विभागाने सर्व स्पोर्ट्स असोसिएशनची बैठक घेऊन राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बैठकीस, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांच्यासह जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य उपस्थित होते.
October 22, 2021

‘मिशन कोल्हापूर गोल्ड’ उपक्रम

आज जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवर जिल्ह्यातील खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळावी, यासाठी क्रीडा विभागामार्फत ‘मिशन कोल्हापूर गोल्ड’ हा उपक्रम…
October 21, 2021

राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन

२१ ऑक्टोबर, राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन. पोलीस कर्मचाऱ्यांची निष्ठा आणि सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करण्यासाठी तसेच शहीद पोलिसांच्या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव…
October 15, 2021

कसबा बावडा येथील सीमोल्लंघन सोहळा

प्रतिवर्षीप्रमाणे यंदा ही कसबा बावडा येथील पॅव्हेलियन ग्राउंड वर सीमोल्लंघन सोहळा प्रसन्न वातावरणात आणि उत्साहात पार पडला. यावेळी, कसबा बावड्यातील हनुमान मंदिर, काशिलिंग देवालय आणि मंगेश्वर…
October 15, 2021

करवीर नगरीतील ऐतिहासिक दसरा सोहळा

करवीर नगरीतील ऐतिहासिक महत्त्व असलेला पारंपरिक दसरा सोहळा यंदा कोरोनाचे नियम पाळून शाही थाटात व शाहूकालीन परंपरेला साजेशा उत्साहात संपन्न झाला. कोल्हापूरचा हा सोहळा देशातील एक…