Uncategorized

आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हयातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे लक्षणीय सदस्य विजयी झाले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुक ही राजकारणाची पहिली पायरी आहे. या निवडणूकीत लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला निवडून दिले आहेत. या विश्वासास पात्र राहून निवडून आलेल्या प्रत्येक सदस्यांनी गावचा विकास आणि ग्रामस्थांची सेवा हेच एकमेव उद्धिष्ठ डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, असे मार्गदर्शन यावेळी केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरजी नाईक, स्व. विलासरावजी देशमुख, बाबासाहेब कुपेकर अशा अनेक दिग्गज गावाच्या राजकारणांतून पुढे येत आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री सुद्धा बनले आहेत.
आजच्या या सोहळ्याला २१ वर्षाची सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य ते सलगपणे बिनविरोध निवडून आलेले होनेवाडी ता.आजरा येथील श्री. गंगाधर बाटकडली (वय वर्षे ७३) यांच्या सोबत जिल्ह्यातील ग्रामपंचायत 1 हजार ८ सदस्य उपस्थित होते.
आज या सर्वांचा उत्साह आणि काम करण्याची तगमग पाहता येणाऱ्या पाच वर्षांमध्ये कोल्हापुरातील अनेक गावे ही राज्याला तसेच देशाला दिशा देणारी आदर्श गावे म्हणून नावारूपाला येतील याची खात्री वाटली.
यावेळी या सर्वांचा सत्कार शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण ,आ. ऋतूराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आ. राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, माजी महापौर निलोफर आजरेकर , जि. प.अध्यक्ष बजरंग पाटील, करवीर सभापती अश्विनी धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, उपमहापौर, नगरसेवक, नगरसेविका, तालुका अध्यक्ष, यांच्यासह जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
January 23, 2021

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हयातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळा

आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हयातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे लक्षणीय सदस्य विजयी…
January 23, 2021

कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक

आज कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी, आगामी २०२१-२२ या वर्षासाठीच्या आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून चालू वर्षाच्या व कोविड-19 चा…
January 22, 2021

नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, कोल्हापूर तर्फे भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी केंद्रीय कृषी…
January 19, 2021

कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वे मार्गासंदर्भात मंत्रालयामध्ये बैठक

कोल्हापूर-पुणे नवीन अतिजलद रेल्वे मार्ग व कोल्हापूर-वैभववाडी या प्रस्तावित रेल्वे मार्गासंदर्भात आज मंत्रालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, या संदर्भातील प्राथमिक अहवाल येत्या पंधरा दिवसात…