Uncategorized

आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुविधा
कोरोनामुक्त रुग्ण किंवा होमआयसोलेशन मधील रुग्णांसाठी आ. ऋतुराज पाटील यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक ही सुविधा सुरू केली आहे. यासाठी ५ लिटर क्षमतेचे ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदासंघासाठी असलेली ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे. अजिंक्यतारा कार्यालय मध्ये हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज सोमवार दि. ७ जून पासून उपलब्ध होणार आहेत.
सध्या सौम्य लक्षण असणारे अनेक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचार घेत आहेत. काही वेळा या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. त्यावेळी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची उपयुक्त आहेत. त्याचबरोबर कोरोना उपचार घेऊन घरी गेलेल्या काही रुग्णांना दमा यासारख्या आजारामुळे काही दिवस ऑक्सिजन द्यावा लागतो.
या गोष्टी लक्षात घेऊन ही ५१ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची बँक तयार केली आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज असेल त्यांच्या नातेवाईकानी यासंदर्भात डॉक्टरांचे पत्र, रुग्णाचे आधार कार्ड, आणि वापराबाबतचे एक हमीपत्र या गोष्टी देऊन हे मशीन घेऊन जायचे आहे. या बरोबरच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कसा वापरावा यासंदर्भात मार्गदर्शन करणारा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे अत्यंत सहजपणे आणि आवश्यकतेनुसार घरी हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरता येणार आहे.
आज फुलेवाडी येथील एका वयोवृद्ध रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर त्यांच्या नातेवाईकांकडे ना. राजेंद्र यड्रावकरजी यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी, आरोग्यराज्यमंत्री ना. राजेंद्र यड्रावकर, आ. प्रकाश आबिटकर, आ. राजूबाबा आवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, गोकुळचे संचालक अमर पाटील आदी उपस्थित होते.

 

June 7, 2021

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुविधा

आ. ऋतुराज पाटील यांच्याकडून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक सुविधा कोरोनामुक्त रुग्ण किंवा होमआयसोलेशन मधील रुग्णांसाठी आ. ऋतुराज पाटील यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बँक ही सुविधा…
June 6, 2021

शिवराज्याभिषेक दिन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात #शिवस्वराज्यदिन साजरा

इतिहासातील सुवर्णसोहळ्याचा साक्षीदार असलेला शिवराज्याभिषेक दिन आज कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात #शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी, ‘शिवशक राजदंड स्वराज्य गुढी’ उभारण्यात आली. याचसोबत, शिवराज्याभिषेक प्रतिमेला…
June 5, 2021

सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘चला, वेली लावूया’

आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘चला, वेली लावूया’ या स्तुत्य उपक्रमाची सुरवात करण्यात आली. या मोहिमेची सुरवात आज कोल्हापुरातील सकाळ कार्यालयासमोर प्रातिनिधिक वेली…
June 3, 2021

मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट

आज कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या नवनिर्वाचित संचालकांसोबत राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी, गोकुळ दूध संघाच्या विविध विषयांवर…