सर्वांग सुंदर कागल साकारण्यासाठी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कागल नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या नाना-नानी ऑक्सीजन पार्क, अत्याधुनिक स्वरुपातील लहान जनावरांचा कत्तलखाना आणि शाहू वसाहत परिसरातील वड्डवाडी येथील चौथ्या टप्प्यातील 90 घरकुलांचे लोकार्पण आज करण्यात आले.
कागल नगरपरिषदेच्यावतीने सुमारे 1 कोटी 35 लाख रुपये खर्च करुन अत्याधुनिक कत्तलखाना तर सुमारे 90 लाख रुपये खर्च करुन नाना-नानी ऑक्सीजन पार्क उभारण्यात आला आहे.
ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली कागल शहरात सर्वांगीण विकास कामांचा धडाका सुरु आहे. या विकास कामांच्या जोरावर भविष्यात ‘कागल’ हे संपूर्ण राज्यात आपली स्वंतत्र ओळख निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.
याप्रसंगी कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, नाविद मुश्रीफ, प्रताप (भैय्या) माने शशिकांत खोत, प्रकाश गाडेकर, नपा मुख्याधिकारी पंडीत पाटील चंद्रकांत गवळी, विवेक लोटे, आशा माने, प्रकाश पाटील यांच्यासह कागल नगरपरिषदेचे नगरसेवक -सेविका, आदी उपस्थित होते.
October 30, 2021

सर्वांग सुंदर कागल

सर्वांग सुंदर कागल साकारण्यासाठी ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, कागल नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या नाना-नानी ऑक्सीजन पार्क, अत्याधुनिक स्वरुपातील लहान जनावरांचा कत्तलखाना आणि शाहू…
October 31, 2021

दिव्यांग रोजगार मेळावा

जन्मतः अनोखे सामर्थ्य घेऊन आलेल्या दिव्यांग बांधवांच्या सक्षमिकरणाच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील १८ वर्षांवरील कुशल, अकुशल दिव्यांगांना त्यांच्या कौशल्यानुसार खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित…
October 30, 2021

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा 19 वा गळीत हंगाम शुभारंभ

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा 19 वा गळीत हंगाम शुभारंभ सन्मानीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते व खा.संजय मंडलिक, आ. पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष…
October 28, 2021

अमरावती प्रादेशिक परिवहन विभाग ( RTO ) आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ( MSRTC ) संदर्भात आढावा

अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रादेशिक परिवहन विभाग ( RTO ) आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ( MSRTC ) संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.…