आज ९ ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन!

दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून बाहेर घालवण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. महात्मा गांधीजी यांनी ‘भारत छोडो’ आणि ‘करेंगे या मरेंगे’चा नारा देऊन स्वातंत्र्याच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. क्रांती दिन म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या जाज्वल्यतेची स्मृती जपणारा हा दिवस!

आज या क्रांती दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी देशासाठी हौतात्म्य अर्पण केलेल्या सर्व शहीद क्रांतीवीरांना आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर-संजय मोहिते, शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, प्रदेश काँग्रेस सचिव तौफिक मुल्लाणी, जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, संजय पोवार (वाईकर), सुरेश कुऱ्हाडे, सुलोचना नायकवडी, दिपाताई पाटील, संध्या घोटणे, किशोर खानविलकर, प्रदीप चव्हाण, विक्रम जरग, शंकरराव पाटील, किरण मेथे, दिपताई पाटील, वैशाली महाडिक, उज्वला चौगुले, चंदाताई बेलेकर, शुभांगी साखरे, यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

August 9, 2020

९ ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन!

आज ९ ऑगस्ट म्हणजेच ऑगस्ट क्रांती दिन! दीडशे वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या इंग्रजांना देशातून बाहेर घालवण्यासाठी ९ ऑगस्ट १९४२ रोजी क्रांतीची ठिणगी पडली होती. महात्मा गांधीजी…
August 7, 2020

पीएससी परीक्षेमध्ये आपल्या कोल्हापूरच्या चार विद्यार्थी-विद्यार्थिनीं घवघवीत यश मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये आपल्या कोल्हापूरच्या चार विद्यार्थी-विद्यार्थिनीं घवघवीत यश मिळवून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नेर्ली गावाच्या डॉ. प्रणोती संकपाळ, राजारामपुरी येथील सौ.…
August 6, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला भेट देऊन आढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी, कोरोना रुग्णांची सद्यस्थिती आणि नियोजन यावर डॉक्टरांशी चर्चा केली. सीपीआर रुग्णालयामध्ये सध्या सध्या एकूण ४००…
August 5, 2020

कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा

रात्रीपासून कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोल्हापूर शहरातील काही सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. याच पार्श्वभूमीवर आ. चंद्रकांत जाधव, महापौर निलोफर आजरेकर,…