म्हाडाच्या सिद्धार्थ नगर ( पत्राचाळ ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ आज माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि महाविकास आघाडीचे नेते, आमचे मार्गदर्शक माननीय खासदार शरद पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार शहरीकरणाच्या वाढत्या रेट्यात मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित निवारा देण्यासाठी कटिबद्ध असून मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील म्हाडाच्या जमिनीवरील सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्था (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ गाळेधारकांच्या १४ वर्षांपासून रखडलेल्या प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ आज झाला, ही निश्चितपणे आनंददायी बाब आहे.

या प्रकल्पात ६७२ मूळ गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ६५० चौरस फूटाची पुनर्विकसित घरे मिळणार आहेत. यामुळे या सर्व सभासदांचे जीवनमान उंचावणार आहे. सदनिका मिळालेल्या सर्वांचे मी मनःपूर्वक

अभिनंदन करतो.
कोरोना काळात स्वतःचे हक्काचे घर असावे ही गरज ठळकपणे अधोरेखित झाली. त्यामुळे प्रचंड वेगाने वाढत्या महानगरांत अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांपैकी निवाऱ्याची गरज भागवताना सर्वसामान्य नागरिकांना हक्काचं आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा आणि महाविकास आघाडी सरकार काम करत आहे.
म्हाडाच्या मार्फत राज्यातील नागरिकांसाठी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सुमारे २७१८८ परवडणाऱ्या सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत.
म्हाडाने कोविडच्या काळामध्ये समर्पित आरोग्य केंद्राची निर्मिती केली असून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी बॉम्बे डाईंग इमारतीमध्ये १०० संक्रमण गाळे उपलब्ध करून दिले आहेत. मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्मिती तसेच रायगड जिल्ह्यातील तळई गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी यासाठी म्हाडाने कायम पुढाकार घेतलेला आहे.
हा कार्यक्रम मा.उपमुख्यमंत्री अजित पवार जी, मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात जी, उद्योगमंत्री सुभाष देसाई जी,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जी, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख जी, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जी,महापौर किशोरी पेडणेकर जी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. महाविकास आघाडीच्या नेत्या आदरणीय सोनिया जी गांधी, आमचे मार्गदर्शक शरद पवार साहेब आणि माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्याचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
February 22, 2022

म्हाडाच्या सिद्धार्थ नगर गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिका बांधकामाचा शुभारंभ

म्हाडाच्या सिद्धार्थ नगर ( पत्राचाळ ) गोरेगाव पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ आज माननीय मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि महाविकास आघाडीचे नेते, आमचे…
February 12, 2022

मौनी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त ‘ज्ञानज्योत’ प्रज्वलित

दरवर्षीप्रमाणे आज मौनी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त पाटगाव येथे ‘ज्ञानज्योत’ प्रज्वलित करण्यात आली. ही ज्योत म्हणजे मौनी महाराजांनी केलेल्या अध्यात्मिक ज्ञानाच्या प्रचाराचे प्रतीक. पाटगाव येथे ही ज्योत…
February 5, 2022

ओला इलेक्ट्रिक’च्या टेस्ट राइड शिबिराचे उदघाटन

ओला इलेक्ट्रिक’च्या वतीने त्यांच्या विद्युत वाहनांच्या कोल्हापुरातील टेस्ट राइड शिबिराचे उदघाटन कंपनीचे उपाध्यक्ष श्री बी.सी.दत्तजी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. ओला दुचाकी गाडी ऑनलाईन बुक केलेल्या कोल्हापूरकरांना…
January 26, 2022

प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूरात ध्वजारोहण केले. या मंगलदिनी थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, क्रांतीकारकांच्या आणि देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले अशा सर्व विचारवंतांच्या प्रती…