कोल्हापूर जिल्हयातील भूमि अभिलेख विभागातर्फे होणारे मोजणीचे काम गतिशील व अधिक अचूक होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ९८.४१ लक्ष रुपयांची अत्याधुनिक रोव्हर मशीन व प्लॉटर मशीन आज विभागाला प्रदान करण्यात आली.
कोल्हापुरातील भूमि अभिलेख विभागाकरिता एकूण ११ रोव्हर आणि ०६ वाईड फॉरमॅट प्रिंटिंग मशीन (प्लॉटर) खरेदी केली असून यामुळे जिल्ह्यातील मोजणी काम अधिक गतिशील व अचूक होणार आहे. अशा प्रकारची अत्याधुनिक सामुग्री उपलब्ध करून देणारा कोल्हापूर हा राज्यातील पहिला जिल्हा आहे.
सदर प्रणाली ही GNSS,GPS वर आधारित असल्याने मोजणी अधिक अचूक व कमी कालावधीमध्ये होणार आहे. यासाठी आवशयक CORS स्टेशनची उभारणी जिल्ह्यातील हातकणंगले व आजरा येथे उभारणी करण्यात आले आहेत.
आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊसा सारखे उंच पिकांमध्ये सुद्धा आता मोजणी करणे शक्य होणार आहे. डोंगराळ भागामध्ये इतर मोजणी साधन सामुग्रीच्या आधारे मोजणी करण्यावर मर्यादा येतात पण या नवीन प्रणालीने हे काम सहजरित्या करता येऊ शकते.
यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख डॉ. वसंत निकम, सुधाकर पाटील, शशिकांत पाटील, किरण माने, नागेंद्र कांबळे, विनायक कुलकर्णी, सुवर्णा पाटील, स्मिता शहा, सुवर्णा मसणे, पल्लवी उगले, सुनिल लाळे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
June 12, 2021

अत्याधुनिक रोव्हर मशीन व प्लॉटर मशीन भूमि अभिलेख विभागाला प्रदान

कोल्हापूर जिल्हयातील भूमि अभिलेख विभागातर्फे होणारे मोजणीचे काम गतिशील व अधिक अचूक होण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ९८.४१ लक्ष रुपयांची अत्याधुनिक रोव्हर मशीन व प्लॉटर मशीन आज…
June 11, 2021

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राधानगरी धरणाला भेट

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जलधोरणांबाबतची दूरदृष्टी म्हणजे १०० वर्षांपूर्वी बांधलेले हे ‘राधानगरी धरण’. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राधानगरी धरणाला भेट देऊन संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी धरणातील…
June 11, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कोरोना सद्यपरिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबतआढावा बैठक

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कोरोना सद्यपरिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी…
June 11, 2021

काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामांची पाहणी

कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आज काळम्मावाडी जलाशयाजवळ सुरु असलेल्या जॅकवेल आणि इंटेक वेल कामाच्या सद्यस्थितीची…