कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज आजरा तालुक्यातील साळगांव, गजरगांव परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीतील वाळू, दरड, गोटे शेतामध्ये आल्याने शेतामध्ये मोठ्या चरी निर्माण झाल्याने नदीकाठावरील भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त भागातील सर्व पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
आजरा तालुक्यामध्ये भात हे मुख्य पीक आहे, मात्र, चालूवर्षी अतिवृष्टीने भात पिकालाच धोका जास्त पोहचला आहे. पेरणोली, साळगाव, चांदेवाडी, हाजगोळी, पेद्रेवादीमी गजरगाव, निंगुडगे, सरोळी, बोलकेवाडी व हत्तिवडे या ठिकाणी हिरण्यकेशी नदी काठावरील भट पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
हिरण्यकेशी नदीला आलेल्या पुरामुळे साळगांव गावातील प्राथमिक शाळेमध्ये पाणी आल्याने शालेय साहित्याचे नुकसान झाले आहे. तसेच, काही शेतकरी बांधवांचे पाणी उपसा करणारे मोटरींची ही नुकसान झाले आहे.
गजरगांव गावातील ग्रामस्थानाचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरत लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर आराखडा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सर्व पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी राज्यसरकार भक्कमपणे उभे असून सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगत दिलासा दिला.
यावेळी, आमदार राजेश पाटील, जि.प.उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, विजयराव देवणे, सुनील शिंत्रे, उमेश आपटे, आजरा नगराध्यक्षा ज्योत्स्ना पाटील, आजरा सभापती उदय पोवार, अंजना रेडेकर, विद्याधर गुरबे, आजरा साखर कारखानाचे व्हा.चेअरमन आनंदराव कुलकर्णीं, सुभाष दोरुगडे, विष्णुपंत केसरकर, कॉ. संपत देसाई, सुधीर देसाई, साळगांव सरपंच पूजा कांबळे, गजरगांव सरपंच आक्काताई पाटील, राजू पाटील उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

August 8, 2021

अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील साळगांव, गजरगांव परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज आजरा तालुक्यातील साळगांव, गजरगांव परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी…
August 8, 2021

अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील कुर, कोणवडे आणि शेणगाव या पूरग्रस्त गावांमध्ये पाहणी

मागील महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज भुदरगड तालुक्यातील कुर, कोणवडे आणि शेणगाव या पूरग्रस्त गावांमध्ये पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांच्या भावना समजावून…
August 7, 2021

पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्याला अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

सह्याद्री डोंगरकड्यांच्या रांगेचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्याला अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची आ. डॉ. विनय कोरे यांच्या समवेत पाहणी…
August 7, 2021

गगनबावडा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज गगनबावडा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी, करूळ घाट व भुईबावडा परिसरातील पाहणी करण्यात आली. अतिवृष्टीमुळे घाटातील दरड कोसळण्याच्या…