राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. सेव्ह लाईफ संस्थेने एनएच-४८ या महामार्गावर पाहणी करून यावरील अपघात कमी करण्यासाठी शासनाला सादर केलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या अहवालामध्ये, अभियांत्रिकी, अंमलबजावणी, आपत्कालीन प्रतिसाद आणि आवश्यक प्रशिक्षणाबाबत सविस्तर शिफारशी केल्या आहेत. या सर्व शिफारशी अंमलात आणण्यासाठी एका आठवड्यामध्ये ‘ॲक्शन प्लॅन’ बनविण्याच्या सूचना परिवहन विभागास देण्यात आल्या आहेत.
पुणे-सातारा आणि सातारा-कागल महामार्गावर २०१९-२० या एका वर्षांमध्ये विविध कारणांमुळे झालेल्या रस्ते अपघातांमध्ये तब्बल २९८ नागरिकांनाचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. याचसोबत तब्बल ३६० अपघात अतिवेगाने मागून टक्कर झाल्यामुळे झाले असून यामध्ये १०६ नागरिक दुर्दवाने मृत्यू झालेत.
हा कॉरिडर ‘शून्य मृत्यू कॉरिडर’ बनविण्यासाठी तसेच राज्यातील सर्व महामार्ग, राज्यमार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
अतिवेग, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, अचानक लेन बदलणे, इंडिकेटर्स, हेडलाईट सुस्थितीत नसने, आदी कारणांनी अपघात होत आहेत. या सर्व बाबींचा सविस्तर विचार करून योग्य त्या सर्व उपायोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याचसोबत, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर पोलीस प्रमुखांना महामार्गावर २४x७ साठी पेट्रोलिंगसाठी प्रत्येकी एक समर्पित गाडी व टीम तयार करून तात्काळ पेट्रोलिंग सुरु करण्यास सूचित केले आहे. तसेच, महामार्गावर माहिती तंत्रज्ञान आधारित पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यात येणार आहेत.
रस्त्यांवरील अपघातामध्ये दुर्दैवाने मृत्यू झालेल्यांपैकी बहुदा तरुण असतो, कुटुंबाचा आधार असतो, हे नुकसान कधीही भरून न निघणारे असते. अपघात हे नैसर्गिक कारणाने ही होतात पण ९० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे होत असल्याचे अनेक अहवालातून समजते.
आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून आपण सर्वांनीही प्रवासावेळी वाहतुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पळून सुरक्षित प्रवास करावा, ही कळकळीची विनंती.
या बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस दलाचे अधिकारी व सेव्ह लाईफ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पियुष तिवारी आदी उपस्थित होते.
September 13, 2021

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या कमी करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. सेव्ह लाईफ संस्थेने एनएच-४८ या महामार्गावर पाहणी करून यावरील अपघात कमी करण्यासाठी शासनाला सादर केलेल्या…
September 12, 2021

कोल्हापुरातील पॅव्हेलियन मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तलवारबाजी हॉलचे भूमिपूजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरु झालेला व महाराष्ट्राची लढाऊ वृत्ती अधोरेखित करणारा खेळ म्हणजे ‘तलवारबाजी’. आज जागतिक तलवारबाजी दिनानिमीत्त कोल्हापुरातील पॅव्हेलियन मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या…
September 10, 2021

महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी स्थित स्मारकाला भेट

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, भारताचे माजी उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांच्या देवराष्ट्रे या त्यांच्या जन्मगावी स्थित स्मारकाला मा. श्री. एच.के. पाटीलजी व…
September 10, 2021

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगलमय वातावरणात, पारंपारिक पद्धतीने घरी लाडक्या श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली. देशासह जगावर आलेले कोरोना संकटाचे विघ्न लवकरात लवकर दूर करून सर्वांना पुन्हा नव्याने उभारीसाठी…