“वृद्धजन हाच खरा संस्कारांचा ठेवा!” आज १ ऑक्टोबर, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सर्व जेष्ठ-वरिष्ठांना सादर प्रणाम! आज ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्येष्ठांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना लसीचा एकही डोस न घेतलेले तसेच पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या ६० वर्षांवरील सर्व जेष्ठ नागरिकांसाठी जिल्ह्यातील सर्व केंद्रांवर या विशेष कोरोना लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ५४ हजार ९४४ ज्येष्ठ नागरिकांनी अजून एकही कोरोना लसीकरणाचा डोस घेतलेला नाही तर ६८ हजार २०६ नागरिक दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत. आज कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन या मोहिमेचा आढावा घेतला.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेल्या या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना प्राध्यान्याने लस देण्यात येणार आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, या विशेष मोहिमेमध्ये सहभागी होऊन आपल्या घरातील, गावातील, परिसरातील ज्येष्ठांना माहिती देवून त्यांचे लसीकरण करुन घ्यावे.
लस घेवूया, सुरक्षित राहूया..
October 1, 2021

वृद्धजन हाच खरा संस्कारांचा ठेवा!

“वृद्धजन हाच खरा संस्कारांचा ठेवा!” आज १ ऑक्टोबर, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सर्व जेष्ठ-वरिष्ठांना सादर प्रणाम! आज ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्येष्ठांसाठी विशेष…
September 30, 2021

WhatsApp Chat-bot चे लोकार्पण

इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी सेफकॉम इंटरनेट अँड ई-कॉमर्स सेफ्टी फौंडेशनने तयार केलेल्या www.scamcheckindia.com…
September 28, 2021

सिंधुदुर्ग पोलीस कार्यालयाला भेट देऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना @Sindhudurg_SP कार्यालयाला भेट देऊन सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी, विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना…
September 27, 2021

‘डेस्टिनेशन कोल्हापूर’

निसर्गाची मुक्त उधळण, इतिहासाचा अमोघ ठेवा, कला, क्रीडा, संस्कृती आणि खाद्य संस्कृतींनी नटलेल्या ‘कोल्हापूर’ला जगाच्या नकाशावर पुढे घेऊन जाण्यासाठी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ‘कोल्हापूर पर्यटन’…