Media Centre

जन्मतः अनोखे सामर्थ्य घेऊन आलेल्या दिव्यांग बांधवांच्या सक्षमिकरणाच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील १८ वर्षांवरील कुशल, अकुशल दिव्यांगांना त्यांच्या कौशल्यानुसार खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित ‘दिव्यांग रोजगार मेळावाचे उदघाटन करण्यात आले.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेचा, कर्तृत्वाचा, दातृत्वाचा वारसा कृतीतून पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वचजण प्रयत्न करत असतो. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे जिल्हास्तरीय ‘दिव्यांग रोजगार मेळावा व हस्तकला प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे.
शासकीय नोकऱ्यांमध्ये दिव्यांग बांधवांना ३ टक्के आरक्षण आहे परंतु, खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील ६५० हून अधिक दिव्यांग बंधू-भगिनी सहभागी होणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय, खाजगी आस्थापनांमध्ये आवश्यक तिथे दिव्यांग बांधवांसाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच शासकीय योजनेतून एकही दिव्यांग बंधू-भगिनी वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला यावेळी दिल्या.
अशा मेळाव्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्याचा आमचा मानस आहे. तसेच, डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून या मेळाव्यामधू
न आज पाच दिव्यांगांना डी.वाय. पाटील ग्रुपमध्ये नोकरी देण्यात आली आहे.
आगामी काळामध्ये सुद्धा जिल्ह्यातील दिव्यांग बंधू-भगिनींचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच यावेळी प्रातनिधीक स्वरुपात दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि.प. सीईओ संजयसिंह चव्हाण, अजयकुमार माने, समाजकल्याण सभापती सौ. कोमल मिसाळ, सभापती सौ. रसिका पाटील, प्रसाद खोबरे, सुभाष सातपुते, महेश चौगुले, विजयसिंह माने, अमर पाटील, सतीश कुरणे तसेच, जिल्ह्यातील विविध औद्योगिक संस्थांचे पदाधिकारी, खाजगी कंपन्यांचे अधिकारी व जिल्ह्यातून आलेले दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते.

 

 

October 31, 2021

दिव्यांग रोजगार मेळावा

जन्मतः अनोखे सामर्थ्य घेऊन आलेल्या दिव्यांग बांधवांच्या सक्षमिकरणाच्या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील १८ वर्षांवरील कुशल, अकुशल दिव्यांगांना त्यांच्या कौशल्यानुसार खाजगी क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित…
October 30, 2021

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा 19 वा गळीत हंगाम शुभारंभ

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचा 19 वा गळीत हंगाम शुभारंभ सन्मानीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते व खा.संजय मंडलिक, आ. पी.एन.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष…
October 28, 2021

अमरावती प्रादेशिक परिवहन विभाग ( RTO ) आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ( MSRTC ) संदर्भात आढावा

अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रादेशिक परिवहन विभाग ( RTO ) आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ( MSRTC ) संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.…
October 28, 2021

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतनेट फेज २ (महानेट) संदर्भात आढावा बैठक

आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतनेट फेज २ (महानेट) संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. अमरावती जिल्ह्यातील सर्व ३९९ ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये फायबर ऑप्टिक केबलचे…