Media Centre

रंकाळा म्हणजे कोल्हापूरचे वैभव, कोल्हापूरची अस्मिता, कोल्हापूरचा श्वास आणि ध्यास. हा रंकाळा तलाव कोल्हापूरच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे.
रंकाळा संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लोक सहभागातून सन २०१३ पासून २५ डिसेंबर हा दिवस ‘रंकाळा दिवस’ म्ह्णून साजरा केला जातो. आज या दिनाचे औचित्य साधून पत्रकार राजेंद्र पाटील यांनी ऐतिहासिक रंकाळयावर लिहिलेल्या “रंकाळा रंकतीर्थ, शौर्यतीर्थ, पक्षीतीर्थ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंकाळा पदपथ उद्यान येथे संपन्न झाला. रंकाळ्याचा इतिहास अभ्यासपूर्ण व अत्यंत सुलभ भाषेत श्री. राजेंद्र पाटील यांनी या पुस्तकाद्वारे मांडला आहे.
कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या या रंकाळ्याचे संवर्धन व संरक्षण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे रंकाळ्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, जेष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. वसंत मोरे, दैनिक सकाळचे समूह संपादक संचालक श्रीराम पवार, शारंगधर देशमुख, राहुल माने, इंद्रजित बोन्द्रे, माणिक पाटील चुयेकर, राजेंद्र पाटील यांच्यासह संवर्धन आणि संरक्षण समितीचे अभिजित चौगले यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
December 25, 2020

२५ डिसेंबर-रंकाळा दिवस

रंकाळा म्हणजे कोल्हापूरचे वैभव, कोल्हापूरची अस्मिता, कोल्हापूरचा श्वास आणि ध्यास. हा रंकाळा तलाव कोल्हापूरच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे. रंकाळा संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लोक सहभागातून…
December 20, 2020

भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान आदरणीय श्रीपती खंचनाळे (वस्ताद) श्रद्धांजली

भारताचे पहिले हिंदकेसरी पैलवान आदरणीय श्रीपती खंचनाळे (वस्ताद), पै. नामदेव पाटील आणि आज सकाळीच शाहूपुरी तालीम येथे पैलवानांचा सराव घेत असताना दुर्दैवी निधन झालेले पै. मुकुंद…
December 12, 2020

‘धन्वंतरी डॉ. वि. ह. वझे मार्ग’ नामकरण

ताराबाई पार्क, कोल्हापूर येथील पितळी गणपती ते हेड पोस्ट ऑफिस रस्त्याचे ‘धन्वंतरी डॉ. वि. ह. वझे मार्ग’ असे नामकरण राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे जेष्ठ…
December 12, 2020

कोल्हापूरच्या माजी महापौर सौ. सूरमंजिरी राजेश लाटकर यांच्या प्रभागातील रस्ते विकास कामांचा शुभारंभ

कोल्हापूरच्या माजी महापौर सौ. सूरमंजिरी राजेश लाटकर यांच्या प्रभागातील रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, खा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील,…