Media Centre

आज कोल्हापूर विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणचे चेअरमन श्री. अनुज अग्रवाल व अन्य संबंधित अधिकाऱ्यांसोबत खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी, नाईट लँडिंग सुविधा, पायलट प्रशिक्षण केंद्र, कार्गो हब उभारणी आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
1370 मी. लांबीची सध्याची विमानतळ धावपट्टी ही 2300 मी. करण्यासाठी लागणारी 64 एकरची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया लवकर करण्यासाठी एक विहित कालावधी ठरवून पूर्ण करण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, 1900 मीटरची धावपट्टी कार्यान्वित करण्यासाठी लागणारी विमानतळ ॲप्रोच लाईट (Approach light), नाईट लँडिंगसाठी लागणारी लाईट्स येत्या दोन महिन्यांमध्ये उभारण्यासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.
याचसोबत, विमानतळाच्या फनेल (Funnel) मध्ये येणारे सर्व अडथळे मॅपिंग करून त्यापैकी काढता येणारे सर्व अडथळे विहित काळामध्ये काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. या सर्व अडथळ्यांचे (Obstacles) मार्किंग करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
हे सर्व अडथळे पाहणी आणि तपासणीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची तज्ञ समिती प्रत्यक्ष कोल्हापूर विमानतळला भेट देणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफ वेळी कोणतेही अडथळे येऊ नये याची योग्य खबरदारी घेतली जाणार आहे.
कोल्हापूर विमानतळाला अद्ययावत बनविण्यासाठी टप्य्यांमध्ये (Phase Wise) विकासकामे पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली असून, यासाठीचे सर्व कामे प्राधान्याने आणि विहित कालावधीमध्ये सूक्ष्म नियोजन करून पूर्ण कारण्यासंदर्भाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
March 16, 2021

कोल्हापूर विमानतळासंदर्भात बैठक

आज कोल्हापूर विमानतळासंदर्भात भारतीय विमानतळ प्राधिकरणचे चेअरमन श्री. अनुज अग्रवाल व अन्य संबंधित अधिकाऱ्यांसोबत खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावेळी, नाईट लँडिंग सुविधा, पायलट…
March 16, 2021

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध आंदोलन

इंधन आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने मुंबई झालेल्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोलेजी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जी, महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात जी…
February 27, 2021

कोल्हापुरातील बांधकाम भवन प्रशासकीय इमारत व 5 फिरत्या पशवैद्यकीय दवाखान्यांचे उद्घाटन

आज कोल्हापुरातील बांधकाम भवन प्रशासकीय इमारतीचे तसेच पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेंतर्गत 5 फिरत्या पशवैद्यकीय दवाखान्यांचे उद्घाटन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने चांगली सुसज्ज इमारत निर्माण…
February 27, 2021
Satej Patil

कोल्हापूर विमानतळ आढावा बैठक

आज कोल्हापूर विमानतळ नाईट लँडिंग, कार्गो सेवा, धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग आदी विषयांबाबत पाहणी करून आढावा बैठक घेण्यात आली. गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत विविध विकास…