Media Centre

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कोरोना सद्यपरिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना करण्यात आली आहे.
राधानगरी तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अकराशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत यामधील ८६३ रुग्ण बरे झाले असून २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आगामी तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राधानगरी येथे लहान मुलांसाठी ५० बेडचे नवीन कोविड सेंटर सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून राधानगरीसाठी दोन व्हेंटिलेटरवर बेड, एक रुग्णवाहिका आणि एक शववाहिका देण्यात येणार आहेत.
तिसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर तालुक्यातील कोमॉर्बीड मुलांचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करून दक्ष राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून बालरुग्ण विभाग, बालरूग्ण कक्ष स्थापन करणे, बालरोग तज्ञ उपलब्ध करण्यासाठी जाहिरात काढून ताबडतोब पद भरती करण्याच्या सूचनाही यावेळी आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.
यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, गोकुळ संचालक अरुणकुमार डोंगळे, गोकुळ संचालक अभिजित तायशेटे, किसन चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदीगरे, अरुण जाधव, राधानगरी पंचायत समिती सभापती वंदना हाळदे उपसभापती मोहन पाटील, आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटे ,वैद्यकीय अधीक्षक गणपती गवळी, हिंदुराव चौगले, सदाशिवराव चरापले, आर के मोरे, राधानगरी तहसीलदार मीना निंबाळकर, गटविकास अधिकारी डॉ. संदीप भंडारी,कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, उपकार्यकारी अभियंता सागर डोंगरे, अमित पाटील, डॉ.पद्मावती भोकरे, कार्यकारी अभियंता अनिल पाटील ,अशोक माने, पोलीस उपनिरीक्षक उदय डुबल, जे.के. पाटील, सुरेश खैरे, शैलेश मोरस्कर, सुधीर जाधव,शहाजी ढेरे, सुशील पाटील, सचिन घोरपडे, बाळासाहेब गुरव आदी उपस्थित होते.
June 11, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कोरोना सद्यपरिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबतआढावा बैठक

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील कोरोना सद्यपरिस्थिती व प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सक्षमपणे तोंड देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना यावेळी…
June 11, 2021

काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामांची पाहणी

कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आज काळम्मावाडी जलाशयाजवळ सुरु असलेल्या जॅकवेल आणि इंटेक वेल कामाच्या सद्यस्थितीची…
June 9, 2021

महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचा वार्षिक अहवाल २०२०-२१ चे विमोचन

आज महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचा वार्षिक अहवाल २०२०-२१ चे विमोचन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मा. ना. अजित पवारजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी,…
June 9, 2021

एसटी महामंडळाच्या आर्थिक उपाययोजनांसाठी उपमुख्यमंत्री ना. अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

एसटी महामंडळाच्या आर्थिक उपाययोजनांसाठी आज उपमुख्यमंत्री ना. अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असल्याने एसटीसाठी सर्वोतोपरी आर्थिक मदत…