Media Centre

आज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर या नव्या विद्यापीठाचे उदघाटन भारताचे माजी कृषिमंत्री सन्माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते व सन्मानीय डॉ डी.वाय.पाटील पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका बजावणारे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या कृषी दिनी या विद्यापीठाचे उद्घाटन होणे हा एक चांगला योगायोग आमच्या सर्वांसाठी आहे.
माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय डॉ. संजय डी. पाटील साहेब यांनी गेली 33 वर्षे अत्यंत खडतर प्रवास करून तळसंदे कॅम्पस वेगळी ओळख प्राप्त करून दिली आहे.
आदरणीय डॉ. संजय डी. पाटील भैया यांच्या दूरदृष्टी आणि नियोजनामुळेच 1989 साली कोल्हापुरातील तळसंदेतील ओसाड माळरानावर सुरु झालेला हा खडतर प्रवास आज कृषी विद्यापीठापर्यंत येऊन ठेपला आहे. कृषिक्षेत्रात संपन्न अशा आपल्या कोल्हापूरमध्ये हे विद्यापीठ सुरु होत आहे, याचा वेगळाच आनंद आहे.
कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशामध्ये आता शेतीमध्ये आधुनिक प्रयोग होणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांची ही नवी पिढी नवनवे प्रयोग शेतीमध्ये करत आहे. काळ्या आईशी असलेल नातं जपत त्याला आधुनिकतेची जोड देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे, संशोधनाचे, प्रात्यक्षिकांचे आणि प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून हे विद्यापीठ कार्यरत राहील.
आज या ऑनलाईन उदघाटन सोहळ्याला महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री मा. ना. जयंत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. उदय सामंत, ग्रामविकास मंत्री मा. ना. हसन मुश्रीफ, कृषी राज्यमंत्री मा. ना. डॉ. विश्वजीत कदम, उच्च व शिक्षण राज्यमंत्री मा. ना. प्राजक्त तनपुरे, आरोग्य राज्यमंत्री मंत्री मा. ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ऑनलाईन पद्धतीने मा. खा. संभाजीराजे छत्रपती, आ. राजू आवळे, आ. प्रकाश आबिटकर, आ. जयंत आसगावकर तसेच कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

July 1, 2021

डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर उदघाटन

आज डी.वाय.पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे, कोल्हापूर या नव्या विद्यापीठाचे उदघाटन भारताचे माजी कृषिमंत्री सन्माननीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते व सन्मानीय डॉ डी.वाय.पाटील…
June 26, 2021
श्री देवी इंदूमती बोर्डिंगची नूतन इमारत श्रीमंत शाहू महाराज यांच्या शुभहस्ते बोर्डिंग व्यवस्थापनाकडे सुपुर्द
सरोज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने स्वर्गीय परशुराम जाधव बापू यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली कोल्हापुरातील श्री देवी इंदूमती बोर्डिंगची नूतन इमारत श्रीमंत शाहू महाराज यांच्या शुभहस्ते आज…
June 26, 2021

सारथी संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उदघाटन

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेच्या कोल्हापूर उपकेंद्राचे उदघाटन मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, श्रीमंत…
June 26, 2021

‘सेवा रुग्णालय’ येथील उठाव शिल्पाचे (म्युरल) उदघाटन

सव्वाशे वर्षांपूर्वी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाच्या माध्यमातून सुरु झालेली वैद्यकीय सेवेची परंपरा आजही कायम आहे. रुग्नालयाच्या ऐतिहासिक जुन्या इमारतीचा पाया भरणी समारंभ दि. १६…