Media Centre

आज बिद्री येथील श्री. दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कोरोना रुग्णांना तसेच भविष्यात सुद्धा लागणारी गरज ओळखून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन आज करण्यात आले.
वैद्यकीय तंज्ञांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने संपुर्ण तयारी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा सक्षम करण्यासाठी जूलै अखेर 11 प्रकल्प कार्यान्वित होत असून यामधून 27 टन ऑक्सिजनची उपलब्धता होणार आहे.
शासनाच्या आवाहनानुसार बिद्री साखर कारखान्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचे आव्हान पेलले आहे. सहकारी क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वप्रथम ऑक्सिजन प्रकल्प उभारुन बिद्रीने कारखान्याने पुण्याईचे काम केले आहे. या प्रकल्पातून दररोज ९० सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती करण्यात येणार आहे.
यावेळी, कार्यक्रम अध्यक्ष माजी चेअरमन दिनकरावजी जाधव साहेब, चेअरमन के.पी. पाटील,ए.वाय.पाटील, व्हा. चेअरमन विठ्ठलराव खोराटे, संचालक प्रविणसिंह पाटील, गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील, प्रविणसिंह भोसले, श्रीपती पाटील, युवराज वारके, विकास पाटील, एकनाथ पाटील, मधुअण्णा देसाई, जगदीश पाटील, विजयसिंह मोरे, बाळाकाका देसाई, शामराव देसाई, सुरेश नाईक, शशिकांत पाटील-चुयेकर, दिनकर कांबळे, विष्णुपंत कुंभार, सर्जेराव देसाई, बाळासो पाटील आदी उपस्थिती होते.
July 11, 2021

दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन

आज बिद्री येथील श्री. दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने कोरोना रुग्णांना तसेच भविष्यात सुद्धा लागणारी गरज ओळखून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन आज करण्यात आले.…
July 10, 2021

संभाव्य पूरस्थितीसंदर्भात सविस्तर आढावा बैठक

आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संभाव्य पूरस्थितीसंदर्भात सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पूरस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या गावांचा आढावा घेण्यात आला. यावर्षी, हवामान विभागाने 110 टक्के पावसाचा अंदाज…
July 10, 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांबाबतआढावा बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. कोविडची दुसरी लाट अजूनही जाणवत आहे, तत्पुर्वीच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा अंदाज…
July 9, 2021

म्हशीच्या दुधाला २ रु. प्रतिलिटर व गाईच्या दुधाला १ रु. प्रतिलिटर दरवाढ

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या निवडणुकीमध्ये शब्द दिल्याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या ११ जुलैपासून म्हशीच्या दुधाला २ रु. प्रतिलिटर व गाईच्या दुधाला १…