Media Centre

आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना @Sindhudurg_SP कार्यालयाला भेट देऊन सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी, विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना खालील सूचना केल्या.
१. जिल्ह्यातील महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन त्याचे सूक्ष्म नियोजन करावे. प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी सोबतच पब्लिक अड्रेस सिस्टीम बसविणाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली आहे.
२. जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि जेष्ठ नागरिक यांचे कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणे.
३. जिल्ह्याला लाभलेल्या १२० किमी लांबीच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने तांत्रिक मनुष्यबळ वाढविणे. याबाबत योग्य नियोजन करून गस्त वाढवावी.
४. सध्याच्या इंटरनेटच्या युगामध्ये ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे, ऑनलाईन गुन्हा तत्काळ नोंदवून पोलीस आणि बँक यांमध्ये योग्य समन्वय ठेऊन काम करण्यास सूचित करण्यात आले आहे.
५. गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आणि पीडितांना तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘डायल ११२’ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करावी.
६. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस विभागामार्फत २४x७ पेट्रोलिंगसाठी समर्पित वाहन व टीम तयार ठेवावी आणि अपघात थांबवण्यासाठी विशेष लक्ष द्यावे.
७. जिल्ह्यातील नवीन विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पेट्रोलिंगसाठी MEDC चे वाहन देण्यासाठी सूचना करावी.
८. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या कामकाजासाठी Standard Operating Procedure (SOP) तयार करावा तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे डाटाबेस सुद्धा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापूर, चक्रीवादळ, भूस्खलन सारख्या नैसर्गिक संकटामध्ये जिल्हा पोलीस दलाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे.
September 28, 2021

सिंधुदुर्ग पोलीस कार्यालयाला भेट देऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना @Sindhudurg_SP कार्यालयाला भेट देऊन सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी, विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना…
September 27, 2021

‘डेस्टिनेशन कोल्हापूर’

निसर्गाची मुक्त उधळण, इतिहासाचा अमोघ ठेवा, कला, क्रीडा, संस्कृती आणि खाद्य संस्कृतींनी नटलेल्या ‘कोल्हापूर’ला जगाच्या नकाशावर पुढे घेऊन जाण्यासाठी ‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ‘कोल्हापूर पर्यटन’…
September 26, 2021

सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालयास भेट, कामकाजाचा आढावा

आज सोलापूर दौऱ्यावर असताना पोलीस आयुक्त कार्यालयास भेट देऊन पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी, दारूबंदी गुन्हे, जुगार गुन्हे, सायबर गुन्हेगारी, सीसीटीव्ही जिओ टॅगिंग, पोलीस रूग्णालय,…
September 25, 2021

पुणे-बेंगलोर महामार्ग सहापदरीकरण भूमिपूजन व लोकार्पण सोहळा

पुणे-बेंगलोर महामार्ग सहापदरीकरणासह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांच्या शुभहस्ते व तिन्ही जिल्ह्यातील…