Media Centre

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतिस्थळ असणाऱ्या गिरगाव, मुंबई येथील “पन्हाळा लॉज” राजवाडा येथे महाराजांच्या कार्याची आठवण म्हणून स्मृतीस्तंभाची उभारणी बाबत आज युवराज मालोजीराजे शाहू छत्रपती आणि शिष्टमंडळासोबत पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली.
दिनांक ६ मे १९२२ रोजी गिरगाव, मुंबई येथील खेतवाडी लेन नं. १३ या ठिकाणी असणाऱ्या तत्कालीन “पन्हाळा लॉज” या बंगल्यात महाराजांचे निधन झाले होते. सन २०२२ हे ”राजर्षी छत्रपती शाहू महाराज” यांचे स्मृतीशताब्दी वर्ष असल्याने या ठिकाणी स्मृतीस्तंभाची उभारणी होणे आवश्यक आहे.
या मागणी संदर्भात आज मालोजीराजे शाहू छत्रपती आणि शिष्टमंडळासोबत पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच याबाबत संबंधित यंत्रणेला स्मृतीस्तंभ उभारण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती यावेळी पर्यटन मंत्री श्री.ठाकरे यांना केली.
यावेळी, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव, गुलाबराव घोरपडे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व संबंधित उपस्थित होते.
October 6, 2021

“पन्हाळा लॉज” राजवाडा स्मृतीस्तंभ

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृतिस्थळ असणाऱ्या गिरगाव, मुंबई येथील “पन्हाळा लॉज” राजवाडा येथे महाराजांच्या कार्याची आठवण म्हणून स्मृतीस्तंभाची उभारणी बाबत आज युवराज मालोजीराजे शाहू…
October 5, 2021

‘सकाळ आयकोनिक प्रोफेशनल्स ऑफ महाराष्ट्र २०२१’

आज पुणे येथे सकाळ समूह आयोजित ‘सकाळ आयकोनिक प्रोफेशनल्स ऑफ महाराष्ट्र २०२१’ हा पुरस्कार सोहळा माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. सचोटी, प्रामाणिकपणा ही मूल्ये जपणाऱ्या व्यावसायिकांना…
October 5, 2021

अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था,नवी दिल्ली यांच्या ५० वे अधिवेशन

आज अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था,नवी दिल्ली यांच्या ५० व्या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते तंत्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मुंबई येथील…
October 2, 2021

  राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमीत्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने गांधी मैदान येथे आयोजित कार्यक्रमावेळी महात्मा गांधीजी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, कोल्हापूर महानगरपालिका व…