Media Centre

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयास (आयजीएम) भेट दिली. रुग्णालयातील आवश्यक सुविधांबाबत पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत कोरोना विषाणू उपाययोजना संदर्भात आढावा बैठक घेतली.

सीपीआरनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठे रूग्णालय म्हणून इचलकरंजी शहरातील आयजीएम रुग्णालयाचे नावलौकिक आहे. या ठिकाणी दाखल होणाऱ्या कोरोना रूग्णांना ऑक्सिजन, मोफत रेडिमीसिव्हीयर लस यांसह अन्य वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

आयजीएम हॉस्पिटलसाठी नुकताच सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक कार्यरत केला असून त्याच क्षमतेचा आणखी एक टँक येथे लवकरच बसवला जाणार आहे. त्याचप्रमाणे सिटीस्कॅनची सुविधाही कार्यान्वीत केली जाणार आहे.

शहरातील कोविडच्या 10 बेडपेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या खासगी हॉस्पिटलमध्ये अँटीजन टेस्ट करण्याची कायदेशीर परवानगी देण्यात येणार असून यासाठी शासनाच्या नियमानुसारच शुल्क आकारण्यात येणार आहे. तसेच १० बेडच्या खालील रूग्णालयांनी नॉन कोविड रूग्णांना सेवा देण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.

इचलकरंजी शहरातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे व कोरोनाबाधितांचे प्रमाण या महिन्यात कमी झाले आहे, ही एक दिलासादायक बाब आहे. इचलकरंजी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. आपण लवकरच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरू.

या, बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, शल्यचिकित्सक बी. सी. केम्पी पाटील, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार प्रदीप उबाळे, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपाधिक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार राजीव आवळे, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य अधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार, डॉ. सुहास कोरे, नगरसेवक सुनिल पाटील, संजय केंगार, राहुल खंजिरे, मदन कारंडे, संजय कांबळे, शशांक बावचकर, महादेव गौड आदी उपस्थित होते.

September 13, 2020

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयास (आयजीएम) भेट

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज इचलकरंजी येथील इंदिरा गांधी रुग्णालयास (आयजीएम) भेट दिली. रुग्णालयातील आवश्यक सुविधांबाबत पाहणी करून स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत कोरोना विषाणू उपाययोजना…
September 13, 2020

संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे सुरु असलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन येथील उपाययोजनांच्या बाबत आढावा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटी येथे सुरु असलेल्या कोविड सेंटरला भेट देऊन येथील उपाययोजनांच्या बाबत आढावा घेतला. तसेच, या…
September 12, 2020

ज्योतिबा कोल्हापूर या मुख्य मार्गावरील पाण्याचा टाका येथील खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी

आज ज्योतिबा कोल्हापूर या मुख्य मार्गावरील पाण्याचा टाका येथील खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मुंबईतील एक भूगर्भ संस्थेतील भूगर्भ तज्ञांना हा रस्ता दाखवून इथल्या…
September 12, 2020

पन्हाळा नगरपरिषद तसेच आसपासच्या परिसरातील परिस्थितीची पाहणी

मंगळवार दि. ०८ सप्टेंबर रोज कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला होता. पन्हाळा गडावर तर अवघ्या तासाभरात १४० मि.मी. इतका पाऊस पडल्याने अनेक सखल…
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email