#BrandKolhapur ची सुरवात कोल्हापूरचे सुपुत्र डॉ .ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते.

#BrandKolhapur ची सुरवात कोल्हापूरचे सुपुत्र डॉ .ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते.

#BrandKolhapur
भारताचे परराष्ट्र सचिव आणि पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया असा लौकिक मिळवलेले कोल्हापूरचे सुपुत्र डॉ .ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते #BrandKolhapur या कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालवधीमध्ये कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणाऱ्या आणि या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कोल्हापूरच्या नामवंत ५० भूमीपुत्रांचा सन्मान सोहळा आज पार पडला.
हा सोहळा म्हणजे या यशोशिलेदारांचा स्नेह मेळावाच ठरला . आपल्या कोल्हापुरात एवढे टॅलेंट आहे हे पाहून उपस्थित विशेष निमंत्रित सुद्धा भारावून गेले .

या निमित्ताने या सर्व यशोशिदारांची माहिती एकत्र करणारी www.brandkolhapur.com ही वेबसाईट सुद्धा आज लाँच केली .
यामुळे एका क्लिक वर कोणालाही कोल्हापूर च्या या टॅलेंट ची योग्य माहिती मिळेल .

#BrandKolhapur हा उपक्रम कोल्हापूरच्या यशोशिलेदारांचा सन्मान सोहळा आहे .या सोहळ्यात प्रत्येक वर्षी उत्कृष्ट कामगिरी करून कोल्हापूरचा झेंडा अटकेपार घेऊन जाणाऱ्या नामवंतांचा सत्कार आपण करणार आहोत. पहिल्या वर्षी काही नावे राहून गेली असली तर ती पुढील वर्षी नक्की यामध्ये समाविष्ट होतील .
या साठी कोल्हापुरात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 15 दिग्गजांची कमिटी कार्यरत राहणार आहे.

कोल्हापूरची जगाला वेगळी ओळख आहेच .ती अजून घट्ट व्हावी आणि कोल्हापूर चे योग्य मार्केटिंग व्हावे, यासाठीचा हा प्रयत्न आहे .

-आमदार सतेज (बंटी) डी. पाटील.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email