admin

पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आसगांवकर व पदवीधर मतदारसंघाचे श्री. अरुण लाड या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्यास आलेल्या कोल्हापुर जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व उस्फुर्त प्रतिसाद पाहता प्रा. जयंत आसगांवकर व श्री. अरुण लाड यांचा विजय निश्चित आहे. शिक्षक व पदवीधर यांचे प्रश्न व अडचणी मार्गी लावण्यासाठी सक्षम आणि अनुभवी असणाऱ्या या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन यावेळी केले.
पक्षाच्या निर्णयाला मान देऊन माघार घेत या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलेले श्री. दादा लाड, श्री. बाबा पाटील, श्री. खंडेराव जगदाळे, श्री. शिवाजीराव मोरे, श्री. भरत रसाळे व श्री. भैय्या माने या सर्वांचे योगदान व सहकार्य अत्यंत महत्वाचे आहे. मी या सर्वांचे मनापासून आभार मानून धन्यवाद देतो.
येणाऱ्या आठ-दहा दिवसांमध्ये महाविकास आघाडी व मित्रपक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कठोर परिश्रम घेऊन या दोन्ही उमेदवारांना पुणे विभागातून कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देत निवडून आणतील, अशी ग्वाही आज उपस्थितांना दिली.
आपल्या दोन्ही उमेदवारांची नावे मतपत्रिकेमध्ये पहिल्याच क्रमांकावर असून त्यांना आपले पहिल्या (1) पसंतीचे मत देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्याची विनंती यावेळी, उपस्थितांना केली.
November 21, 2020

कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा

पुणे शिक्षक मतदारसंघाचे प्रा. जयंत आसगांवकर व पदवीधर मतदारसंघाचे श्री. अरुण लाड या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आज कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष पदाधिकारी…
November 15, 2020

सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा

पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातून महाविकासघडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगांवकर तर पुणे पदवीधर मतदारसंघातून श्री. अरुण लाड यांच्या प्रचारार्थ आज सातारा येथे सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी…
November 5, 2020

‘भव्य ट्रॅक्टर रॅली’

केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्यांविरोधात राज्याचे प्रभारी मा. श्री. एच. के. पाटीलजी, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब थोरातजी, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाणजी, कृषीराज्यमंत्री ना.…
October 31, 2020

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत अजिंक्यतारा कार्यालय येथे सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. नुकताच कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने १० कोटी…