admin

आज कोल्हापूर विमानतळ नाईट लँडिंग, कार्गो सेवा, धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग आदी विषयांबाबत पाहणी करून आढावा बैठक घेण्यात आली.
गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत विविध विकास कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये, धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग, संरक्षण भिंत, रस्ता रुंदीकरण, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वीजपुरवठा आदी कामांचा समावेश आहे.

कोल्हापुरातील नाईट लँडिंग बाबत नागरी उड्डाण संचानालय यांनी अडथळे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यापैकी काही अडथळे काढण्यात आली असून काहींमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या माध्यमातून नागरी उड्डाण संचानालय अधिकाऱ्यांसोबत दिल्लीला पुढील आठवड्यामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

विमानतळ बिल्डिंग कामामध्ये कोरोना संकटामुळे काही काळ व्यत्यय आला असल्याने हे काम आता येणाऱ्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्‍त ६४ एकर जागा संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या भूसंपादनामुळे धावपट्टीचे विस्तारीकरण १३७० मी. वरून २३०० मीटरपर्यंत होणार आहे.

विमानतळासाठी लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या १५ दिवसांमध्ये पाईपलाईन टाकून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. सोबतच समर्पित ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे सुद्धा काम पूर्ण झाले आहे.
आतापर्यंत सुमारे २ लाख १३ हजार प्रवास्यांनी कोल्हापूर विमानतळावरून प्रवास केला आहे. कोल्हापूरमध्ये अद्यावत विमानसुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आणि अजून जास्तीचे मार्ग लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यसाठी आम्ही सर्वचजण कटीबद्द आहोत.

छ. राजाराम महाराज यांनी सुरु केलेल्या या कोल्हापूर विमानतळाच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आले आणि त्यांनी कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभे राहण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले याबद्दल जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचा मनापासून आभारी आहे.

या बैठकीला, खा. संभाजीराजे छत्रपती, खा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आबिटकर, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, व्ही.बी.पाटील, तेज घाटगे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विमानतळ संचालक कमलकुमार कटारीया, तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

 

February 27, 2021
Satej Patil

कोल्हापूर विमानतळ आढावा बैठक

आज कोल्हापूर विमानतळ नाईट लँडिंग, कार्गो सेवा, धावपट्टी विस्तारीकरण, टर्मिनल बिल्डिंग आदी विषयांबाबत पाहणी करून आढावा बैठक घेण्यात आली. गेल्या वर्षभरापासून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत विविध विकास…
January 26, 2021

७२ व्या प्रजासत्ताक दिन

७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज कोल्हापूरात पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण केले. आजही आपण त्याच उत्साहाने आणि आनंदाने देशभर हा आनंदाचा दिवस साजरा करत आहोत. #RepublicDay ज्यांच्या त्यागातून…
January 24, 2021

सहकारमहर्षी मा. श्री. वसंतराव तात्यासाहेब मोहिते काका यांच्या ८० व्या अभिष्टचिंतन सोहळा

कोल्हापुरातील यळगूड येथील श्री. हनुमान सह. दूध व्याव. व कृषिपूरक सेवा संस्थेचे (यळगूड दूध संघ) संस्थापक चेअरमन सहकारमहर्षी मा. श्री. वसंतराव तात्यासाहेब मोहिते काका यांच्या ८०…
January 23, 2021

कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हयातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळा

आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हयातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे लक्षणीय सदस्य विजयी…