admin

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली. जिल्हा प्रशासकडून पूरबाधित गावांमध्ये एनडीआरएफ पथक, प्रशासन व स्वयंसेवकांच्या मदतीने पुरग्रस्तांचे स्थलांतर आदी उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे जिवीत व वित्त हानी झाली आहे. शेती, रस्ते, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात दरड कोसळणे, भूस्खलन झाले आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याचे यावेळी मा. उपमुख्यमंत्री यांना सांगितले.
‘पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभं करण्याचे काम राज्य शासन करेल,’ अशी ग्वाही देवून पाणी ओसरेल तसे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांनी दिल्या आहेत.
बैठकीला ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ,आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार सर्वश्री पी.एन.पाटील, ऋतुराज पाटील, प्रकाश आवाडे, चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे, राजेश पाटील, जयंत आसगावकर, प्रकाश आबीटकर यांच्यासह माजी आमदार, पदाधिकारी, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण,जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
July 27, 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत मा. अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीबाबत शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात मा. उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासमवेत आढावा बैठक घेण्यात आली.…
July 27, 2021

पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवारजी यांच्या समवेत कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

कोल्हापुर जिल्ह्याच्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवारजी, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटीलजी यांच्या समवेत कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून स्थलांतरित…
July 25, 2021

गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये भेट देवून पुरग्रस्तांशी संवाद साधला.

आज शिरोळ तालुक्यातील पुरग्रस्त व जनावरांचे प्रशासनाच्यावतीने गुरुदत्त साखर कारखान्याच्या छावणीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. या छावणीला आज भेट देवून पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली.…
July 24, 2021

चिखली व आंबेवाडी गावातील पूरपरिस्थितीचा आढावा

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे. आज दुपारी २ वा. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा पातळी ५२ फूट ६ इंच इतकी आहे. करवीरचे आमदार पी.एन.पाटील व जिल्हा…