admin

आज गडहिंग्लज तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यावेळी दुंडगे आणि हेब्बाळ गावातील पूरग्रस्त नागरिकांशी सवांद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
गडहिंग्लज तालुक्यामध्ये २२, २३ आणि २४ जुलै या तीन दिवसांमध्ये ३४४ मिमी पाऊसाची नोंद झाली आहे. यामुळे, तालूक्यातील २३ गावांमधील १७४३ कुटुंबे बाधित झाली आहेत.
तालुक्यातील नदीकाठच्या गावात महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी, अतिवृष्टी व महापुरामुळे उत्तूर येथील संजय उत्तूरकर यांच्या नुकसान झालेल्या पोल्ट्रीची पाहणी केली. तसेच, तालुक्यातील सर्व पंचनामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
गडहिंग्लज तालुक्यातील जुने ओढे-नाले जे बुजले आहेत त्यांची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी करून ओढ्या-नाल्यांचे पाणी पावसाळ्यात नागरी वस्तीत शिरणार नाही, याबाबत योग्य आणि कायस्वरूपी उपायोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे.
तसेच गडहिंग्लज तालुक्यातील नद्यांमध्ये साचलेला कचरा काढण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. पुनर्वसन करताना संबंधित पूरग्रस्त बांधवांना शासकीय योजनेतुन घरकुलसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी करण्यात आल्या आहेत.
यावेळी, आमदार राजेश पाटील, संग्राम नलवडे, कॉम्रेड संपत देसाई, विजयराव देवणे, सुनील शिंत्रे, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगले, रमेश पाटील, बी.एन. पाटील, बसवराज आजरी, बालेश नाईक, बाळासाहेब पाटील, संदीप देसाई, डॉ. संजय पाटील, विजय पाटील, गटविकास अधिकारी शरद मगर, प्रशांत देसाई, प्रांताधिकारी विजया पांगारकर, अमर चव्हाण, श्रीप्रसाद तेली, सरपंच ज्योती धनवडे, रमजान अत्तार, उपस्थित होते.
August 8, 2021

डहिंग्लज तालुक्यातील पूरग्रस्त दौरा

आज गडहिंग्लज तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यावेळी दुंडगे आणि हेब्बाळ गावातील पूरग्रस्त नागरिकांशी सवांद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. गडहिंग्लज तालुक्यामध्ये…
August 8, 2021

अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आजरा तालुक्यातील साळगांव, गजरगांव परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यामध्ये आलेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज आजरा तालुक्यातील साळगांव, गजरगांव परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी…
August 8, 2021

अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यातील कुर, कोणवडे आणि शेणगाव या पूरग्रस्त गावांमध्ये पाहणी

मागील महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज भुदरगड तालुक्यातील कुर, कोणवडे आणि शेणगाव या पूरग्रस्त गावांमध्ये पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांच्या भावना समजावून…
August 7, 2021

पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्याला अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

सह्याद्री डोंगरकड्यांच्या रांगेचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्याला अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची आ. डॉ. विनय कोरे यांच्या समवेत पाहणी…