admin

कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार व महाआवास योजना पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार हे पुरस्कार प्राप्त व्यक्तीसाठी एक नवीन सुरुवात असून यापुढील काळात ही अपेक्षा अधिक उत्कृष्ट काम परस्परांच्या सहकार्याने करावे. कोल्हापूर जिल्हा परिषद ही विकासात्मक कामात राज्यातच नव्हे तर देशात आघाडीवर असली पाहिजे यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी केले.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करण्याची मोठी संधी असून या संधीतून त्यांनी तळागाळातील लोकापर्यंत विकास कामे घेऊन जाऊ शकतात.
कोल्हापूर जिल्हा परिषदेने निर्मल ग्राम व ओडीएफ मध्ये चांगले काम केले असून पुढील काळात ही जिल्हा परिषद ओडीएफ प्लस झाली पाहिजे यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करणे गरजेचे आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने डेस्टिनेशन कोल्हापुरचे ब्रँडिंग केले जात असून या माध्यमातून पुढील काळात कोल्हापूर जिल्हा जगाच्या पर्यटनाच्या नकाशावर येण्यासाठी सर्वांनी एकत्रित मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असला तरी अजून पन्नास ते साठ टक्के लोकांचे लसीकरण झालेले नाही. तसेच आजच्या ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आपल्या कुटुंबातील व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे 100% लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले.
यावेळी, ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, शिक्षण व अर्थ समिती सभापती श्रीमती रसिका पाटील, सभापती बांधकाम व आरोग्य समिती सभापती श्रीमती वंदना जाधव, महिला व बाल कल्याण सभापती श्रीमती शिवानी भोसले, समाज कल्याण समिती सभापती श्रीमती कोमल मिसाळ, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, सदस्य सतीश पाटील, युवराज पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
October 1, 2021

राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार

कोल्हापूर जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार व महाआवास योजना पुरस्कारांचे आज वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणारे पुरस्कार…
October 1, 2021

वृद्धजन हाच खरा संस्कारांचा ठेवा!

“वृद्धजन हाच खरा संस्कारांचा ठेवा!” आज १ ऑक्टोबर, जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सर्व जेष्ठ-वरिष्ठांना सादर प्रणाम! आज ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्येष्ठांसाठी विशेष…
September 30, 2021

WhatsApp Chat-bot चे लोकार्पण

इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व महाराष्ट्र सायबर पोलीस विभागाच्या प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी सेफकॉम इंटरनेट अँड ई-कॉमर्स सेफ्टी फौंडेशनने तयार केलेल्या www.scamcheckindia.com…
September 28, 2021

सिंधुदुर्ग पोलीस कार्यालयाला भेट देऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना @Sindhudurg_SP कार्यालयाला भेट देऊन सिंधुदुर्ग पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी, विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना…