admin

आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट देऊन पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी, विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली.
यावेळी, पोलीस घटकातील संख्याबळ, गुन्ह्यांची आकडेवारी, प्रतिबंधात्मक कार्यवाही, दोषसिद्धीचे प्रमाण, सायबर गुन्हेगारी, अनुकंप भरती, प्रतिबंधात्मक कार्यवाही, कोविड काळातील कार्य याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.
सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्हीचे नेटवर्क उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा नियोजनातून टप्प्याटप्प्याटप्प्याने निधी मिळवण्याचा प्रयत्न करावा. खासगी आस्थापनांनी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे बंधनकारक करण्याबाबत सूचित करण्यात आले.
पोलीस विभागातर्फे ‘कोर्ट केस मॉंनिटरिंग सिस्टीम’ हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम पोलीस दलाने राबविला आहे. या माध्यमातून एका क्लीकवर खटल्यांची माहिती उपलब्ध होत आहे.
महिला व बालकांवरील अत्याचार व कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी महिला पोलीस मित्रांची मदत घेतली जात आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातुन महिला पोलीस घरोघरी जाऊन महिलांच्या अडचणी सोडविल्या जात आहेत. तसेच महिलांना महिला विषयक कायद्याची माहिती मिळावी आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने जनजागृती अभियानाचा भाग म्हणून ‘ सन्मान पुस्तिका ‘ तयार करण्यात आली आहे.
विभागामार्फत राबविले जाणारे सायबर अवेरनेस वीक, सायबर हायजिन, ई – लायब्ररी आदी उपक्रम कौतुकास्पद आहेत. तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कोरोनाकाळात पोलिसांनी अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. संचारबंदीनंतरच्या काळात जनजीवन पूर्वपदावर येऊन सर्व क्षेत्रात व्यवहार सुरू झाले आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अधिक सजग राहून काम करावे. सायबर सुरक्षिततेवर भर देण्याच्या सूचना यावेळी केल्या.
यावेळी, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, एम.एम.मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील, भरत गायकवाड, लक्ष्मण डुंबरे, पोलीस अधिकारी व सबंधित उपस्थित होते.

 

 

 

 

October 28, 2021

अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट देऊन कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट देऊन पोलीस दलातील अधिकाऱ्यांसोबत जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. याप्रसंगी, विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती घेतली.…
October 24, 2021

कागल ते पेठ नाका आणि पेठ नाका ते शेंद्रे या प्रस्तावित सहापदरी प्रकल्पाच्या कामाबाबत बैठक

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मा. नितीन गडकरी जी यांच्या सूचनेनुसार कागल ते पेठ नाका आणि पेठ नाका ते शेंद्रे या प्रस्तावित सहापदरी प्रकल्पाच्या कामाबाबत कोल्हापूर, सांगली…
October 23, 2021

३२ व्या राज्यस्तर वरिष्ठगट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन

  महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन, शिवाजी विद्यापीठ, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि कोल्हापूर फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३२ व्या राज्यस्तर वरिष्ठगट फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे…
October 22, 2021

आनंदोत्सव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली १९ महिने बंद असलेले चित्रपटगृह व नाट्यगृह आज पासून सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपणारे ऐतिहासिक केशवराव…