राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या हिरक महोत्सव

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या हिरक महोत्सव

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या हिरक महोत्सवानिमित्त, कोल्हापूर शाखेच्यावतीने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये विविध संवर्ग संघटनांचे गुणवंत कर्मचारी, माजी पदाधिकारी तसेच वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
प्रशासन आणि राज्यकर्ते ही दोन चाक सक्षम असल्यास विकासाचा गाडा चांगल्या प्रकारे चालू शकतो. कोरोना आणि महापूर या आपत्तीच्या काळातही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रिक येत संघटनेची ही वज्रमूठ सर्वांनी कायम ठेवावी. याशिवाय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय व्यवस्थेत काम करत असताना जनतेची कामे वेळेत होण्यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन यावेळी केले.
जिल्हा पातळीवरील सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी तसेच जुनी पेन्शन योजनेसह राज्यस्तरीय मागण्यांकरिता शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली.
महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे कार्पोरेट कार्यालय असल्याने राज्याचे आर्थिक उत्पन्न चांगले आहे. मात्र दुर्दैवाने गेल्या आठ वर्षांपासून अनेक महत्त्वाचे उद्योग आणि कार्पोरेट कार्यालय इतर राज्यांमध्ये हलवण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे याविरोधात लढा उभारावा लागल्यास त्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी केले.
या कार्यक्रमात पोलीस कर्मचारी सुहास पवार, अजय सावंत, मंडल अधिकारी बी.एस.खोत, प्रविण कोडोलीकर, विलास कुरणे, प्रकाश पाटील, आरोग्य पर्यवेक्षक पी.एन.काळे या गुणवंत कर्मचाऱ्यांसोबतच विविध संवर्गातील कर्मचारी संघटना आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी, कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, संघटनेचे सरचिटणीस अनिल लव्हेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ उमेश कदम, संघटनेचे कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष वसंत डावरे, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील देसाई, संजय क्षीरसागर, गुलाब पवार, पुणे उपध्याक्ष मारुती शिंदे, गणेश देशमुख, यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी उपस्थित होते.