कोल्हापुरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपयोजना आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालरोग तज्ज्ञांसोबत आढावा बैठक

कोल्हापुरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपयोजना आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने बालरोग तज्ज्ञांसोबत आढावा बैठक

आज कोल्हापुरातील कोरोना प्रतिबंधात्मक उपयोजना आणि संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी बालरोग तज्ज्ञांसोबत विडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.
संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याच पार्श्वभूमीवर या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांनी सज्ज राहावे, तसेच यासाठी लागणारा कृती आराखडा येत्या बुधवार पर्यंत तयार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील 40 लाख लोकसंख्येपैकी 18 वर्षांखालील युवक, युवतींनी संख्या अंदाचे 10 लाख इतकी आहे. मुले, मुलींची संख्या शिक्षण विभागाच्या सहाय्याने निश्चित करण्यात यावी. आरोग्य विभागाने संभाव्य तिसऱ्या लाटेचे सूक्ष्म नियोजन करावे. आरोग्य विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे 200 आयसीयु बेड लागतील. या करिता जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात अनुक्रमे 50 तर खाजगी रुग्णालयात 150 व्हेंटीलेटर बेड तालुकानिहाय निश्चित करण्यात येणार असून यामध्ये 10 ऑक्सीजन तर 2 व्हेंटीलेटर बेडचा समावेश असेल असेही स्पष्ट करुन डॉक्टरर्सनी मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाहीतर आश्वस्त करण्याबाबत यावेळी सांगण्यात आले आहे.
या बैठकीत जिल्ह्यातील इतर बालरोग तज्ज्ञांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. सोबतच उपचार पध्दतीमध्ये पालकांना येणाऱ्या अडचणी आणि शंकाचे निरसन केले आहे.
यावेळी, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सीपीआर रुग्णालय बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता कुंभोजकर, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगश साळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक पोळ आदी प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील इतर मान्यवर बालरोग्य तज्ज्ञ व्ही सी व्दारे उपस्थित होते.
Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email