पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्‍याकडून २ यांत्रिकी बोटी प्रदान

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्‍याकडून २ यांत्रिकी बोटी प्रदान

गतवर्षीच्या महापुराच्या व संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी जिल्हा प्रशासनाकडे प्रत्येकी २ यांत्रिकी बोटी देण्याचा निर्णय सर्व कारखाना संचालकांनी केला होता. आज पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कारखान्‍याकडून गगनबावडा तहसिल प्रशासनाकडे आवश्‍यक त्‍या सर्व साहित्यांसह दोन यांत्रिक बोटी करण्‍यात आल्‍या.

पावसाचे आगार म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या गगनबावडा तालुक्‍यातील काही भागाला दरवर्षी पुराच्‍या पाण्‍याचा सामना करावा लागतो. पुरांमुळे तालुक्‍यातील काही गावांचा संपर्क तुटतो. अशा या आपत्कालीन परिस्थितीमध्ये या बोटींची मदत होणार आहे.

या बोटी प्रदान समारंभास जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष बजरंग पाटील, कारखान्‍याचे संचालक मानसिंग पाटील, बी. डी. कोटकर, उदय देसाई, खंडेराव घाटगे, गुलाबराव चव्‍हाण, चंद्रकांत खानविलकर, रविंद्र पाटील, जयसिंग ठाणेकर, प्रभाकर तावडे, दत्‍तात्रय पाटणकर, सभापती संगीता पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, जि. प. सदस्‍य भगवान पाटील, सहा. पोलिस निरीक्षक संगीता पाटील, कार्यकारी संचालक जयदिप पाटील, सेक्रेटरी नंदू पाटील आदि उपस्थित होते.

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email