करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरामध्ये ‘स्मार्ट पार्किंग’ बहुमजली इमारतीचे उदघाटन

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरामध्ये ‘स्मार्ट पार्किंग’ बहुमजली इमारतीचे उदघाटन

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून येणाऱ्या भाविकांना योग्य पार्किंगची व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी ‘स्मार्ट पार्किंग’ची सुविधा लवकरच सुरु करत आहोत.

यामध्ये, भाविकांना ऑनलाईन पद्धतीने पार्किंगची जागा आरक्षित करता येणार आहे. सध्या सुमारे १५० चारचाकी व १५५ दुचाकी पार्किंगची क्षमता असलेल्या या इमारतीमध्ये भविष्यात सुमारे ३०० चारचाकी व ३१० दुचाकींची पार्किंगची व्यवस्था करता येईल.
आज मंदिर परिसरामध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत या बहुमजली पार्किंग इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, महापौर सौ. निलोफर आजरेकर, डॉ. योगेश जाधव, आ. चंद्रकांत जाधव, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, उपमहापौर संजय मोहिते, सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, श्रावण फडतारे, विजय सूर्यवंशी, सौ. हसीना फरास, शारंगधर देशमुख, अजित ठाणेकर, शेखर कुसाळे, राहुल चव्हाण तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email