रंकाळा म्हणजे कोल्हापूरचे वैभव, कोल्हापूरची अस्मिता, कोल्हापूरचा श्वास आणि ध्यास. हा रंकाळा तलाव कोल्हापूरच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक बनला आहे.
रंकाळा संवर्धनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन लोक सहभागातून सन २०१३ पासून २५ डिसेंबर हा दिवस ‘रंकाळा दिवस’ म्ह्णून साजरा केला जातो. आज या दिनाचे औचित्य साधून पत्रकार राजेंद्र पाटील यांनी ऐतिहासिक रंकाळयावर लिहिलेल्या “रंकाळा रंकतीर्थ, शौर्यतीर्थ, पक्षीतीर्थ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंकाळा पदपथ उद्यान येथे संपन्न झाला. रंकाळ्याचा इतिहास अभ्यासपूर्ण व अत्यंत सुलभ भाषेत श्री. राजेंद्र पाटील यांनी या पुस्तकाद्वारे मांडला आहे.
कोल्हापूरचे वैभव असणाऱ्या या रंकाळ्याचे संवर्धन व संरक्षण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे रंकाळ्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती, जेष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. वसंत मोरे, दैनिक सकाळचे समूह संपादक संचालक श्रीराम पवार, शारंगधर देशमुख, राहुल माने, इंद्रजित बोन्द्रे, माणिक पाटील चुयेकर, राजेंद्र पाटील यांच्यासह संवर्धन आणि संरक्षण समितीचे अभिजित चौगले यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.