२३ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेच्या निरोप समारंभाप्रसंगी

२३ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेच्या निरोप समारंभाप्रसंगी

आज २३ व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेच्या निरोप समारंभाप्रसंगी देशातून आलेल्या मान्यवरांना संबोधित केले. यावेळी, महाराष्ट्र राज्य प्रशासन राबवताना आधुनिक तंत्रज्ञान वापरून जनतेच्या सोईस्कर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. महाराष्ट्र राज्याचा माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणून राज्यात जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाच्या सोयी-सुविधा सहजरित्या मिळण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी सांगितले. प्रशासनाने घेतलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण सुद्धा यावेळी झालेला. देशातील विविध राज्यांच्या तंत्रज्ञान विभागाने राबवलेल्या उपक्रमांच्या प्रदर्शनाला देखील भेट दिली व विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक केले.

यावेळी, केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास, प्रशासकीय सुधारणा व जनतक्रार, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा व अवकाश विकास राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह, भारत सरकार प्रशासकीय सुधारणा व जन तक्रार विभागाचे अतिरिक्त सचिव व्ही.श्रीनिवास, सचिव छत्रपती शिवाजी, केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव प्रकाश साहनी तसेच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास तसेच संपूर्ण देशातून आलेले अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

– ना. सतेज (बंटी) डी. पाटील

Facebook
Instagram
YouTube
YouTube
Follow by Email